बॉयफ्रेण्डचा घटस्फोट, करिश्मा कपूर पुन्हा बोहल्यावर चढणार!
सात वर्ष घटस्फोटाच्या लढाईनंतर परस्पर संमतीने वैवाहिक आयुष्य संपवून संदीप तोषणीवाल अखेर पत्नीशी विभक्त झाला.
मुंबई : बॉलिवूडच्या कपूर कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघड्यांचे सूर ऐकायला मिळणार आहेत. कपूर खानदानची मुलगी करिश्मा कपूर पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. करीश्मा लवकरच बॉयफ्रेण्ड आणि दिल्लीतील बिझनेसमन संदीप तोषणीवालसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सात वर्ष घटस्फोटाच्या लढाईनंतर परस्पर संमतीने वैवाहिक आयुष्य संपवून संदीप तोषणीवाल अखेर पत्नीशी विभक्त झाला. संदीप तोषणीवालने सोमवारी वांद्र्यातील कौटुंबिक न्यायालयात पत्नीकडून घटस्फोट घेतला. संदीप तोषणीवाल आणि त्याची डॉक्टर पत्नी अश्रिता यांनी परस्पर संमतीने 14 वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय घेतला. करीश्मा कपूर आणि संदीप तोषनीवाल तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. संदीपने 2010 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. सात वर्ष संदीप आणि पत्नी दोघांमध्ये घटस्फोटासाठी लढाई सुरु होती. या वर्षाच्या सुरुवातीलाच दोघे वाटाघाटीसाठी तयार झाल्याने घटस्फोटाची कारवाई पुढे सरकली. घटस्फोटाच्या वाटाघाटीसाठी तोषणीवाल दोन्ही मुलींच्या (12 वर्ष आणि 9 वर्ष) पालनपोषणासाठी 3-3 कोटी रुपये देणार असून पत्नी अश्रिताला 2 कोटी रुपयांची पोटगी देणार आहे. याशिवाय अश्रिता आता जिथे राहते ते दिल्लीतील घरही तिच्याच नावावर असेल. तसंच दोन्ही मुलींचा ताबा आईकडेच राहिल. दुसरीकडे करीश्मानेही मागील वर्षी पती संजय कपूरकडून घटस्फोट घेतला होता. संजय कपूर हा दिल्लीतील प्रसिद्ध बिझनेसमन आहे. दोघांनी 2003 मध्ये लग्न केलं होतं. घटस्फोटानंतर संजयने आता प्रिया सचदेवशी लग्न केलं आहे. प्रिया सचदेव ही प्रसिद्ध हॉटेल मालक विक्रम चटवालची पत्नी होती.
संबंधित बातम्या
घटस्फोटानंतर करिश्मा कपूर बॉयफ्रेण्डसोबत लिव्ह-इनमध्ये राहणार!
करिश्मा-संजयचा अखेर घटस्फोट, मुलांना 10 कोटी, डुप्लेक्स बंगला
करिश्मा-संजय यांच्यात घटस्फोटावर सहमती, करिश्माकडे मुलांचा ताबा