Kareena Kapoor : करीना कपूरने शेअर केले मालदीवमधील फोटो, थ्रो बॅक फोटो व्हायरल
Kareena Kapoor - Karishma Kapoor : अभिनेत्री करीना कपूर खान आणि करिश्मा कपूरने मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा ग्रुप फोटो मालदीवमधील सुट्टीतील आहे. दोन्ही बहिणी आता सुट्टीवरून मुंबईत परतल्या आहेत.
Kareena Kapoor Maldives Vacation : अभिनेत्री करीना कपूर खानने (Kareena Kapoor) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा ग्रुप फोटो मालदीवमधील सुट्टीतील आहे. दोन्ही बहिणी आता सुट्टीवरून मुंबईत परतल्या आहेत. करीना आणि करिश्माने मालदीव ट्रिपदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले असले तरी, करीनाने एका लास्ट फोटो शेअर करत ट्रिप संपल्याचं म्हटले आहे. करीनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर या दोघीही मुलांसोबत बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहेत. प्रत्येकाची पाठ कॅमेऱ्याकडे आहे. समोर समुद्र असून दोन्ही बाजूला नारळाची झाडे दिसत आहेत.
करीनाने शेअर केला फोटो
फोटोमध्ये करीनाने पांढऱ्या आणि काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. करिश्मा ब्लॅक रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर जेह आणि तैमूरने शॉर्ट्स घातले आहेत. करिश्माच्या मुलानेही शॉर्ट्स घातली आहे, तर मुलीने लाल आणि काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. प्रत्येकजण पाण्यात भिजताना दिसत आहे. ग्रुप फोटो शेअर करताना करिनाने कॅप्शनमध्ये 'स्प्रिंग ब्रेक 2022' असे लिहिले आहे.
View this post on Instagram
करीना आणि करिश्माचा मुलांसोबतचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. काहींनी दोन्ही बहिणींचे बॉन्डिंग जबरदस्त असल्याचे म्हटले आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी, करीना कपूर खान मुंबईच्या कलिना विमानतळावर दोन्ही मुलांसोबत (जेह आणि तैमूर) दिसली होती. त्यांच्यासोबत बहीण करिश्मा कपूरही दिसली. या दोघी बहिणी मुलांना मालदीवमध्ये सुट्टीसाठी घेऊन गेल्या होत्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- RRR : राम चरण आणि ज्युनियर एनटीआरने आमिर खानला शिकवला डान्स, 'नाटू नाटू' गाण्याचा व्हिडीओ व्हायरल
- Hair Care Tips : 'या' कारणांमुळे सुरू होते केस गळणे, चुकूनही दुर्लक्ष करू नका
- Viral Video : रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत होता मुलगा, नेटकरी करतायत सलाम, कारण ऐकून व्हाल थक्क
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha