Kartik Aaryan : कार्तिक आर्यन अन् करण जोहरचा वाद मिटला; 'या' सिनेमात करणार एकत्र काम
Kartik Aaryan Movie : कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि करण जोहरचा (Karan Johar) वाद मिटला असून धर्मा प्रोडक्शनच्या आगामी सिनेमात ते एकत्र काम करणार आहेत.

Kartik Aaryan Upcoming Movie : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. इंडस्ट्रातील मंडळींसह चाहतेही अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी 'चंदू चैंपियन' या सिनेमामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्याला वाढदिवसाची खास भेट मिळाली आहे. धर्मा प्रोडक्शनच्या आगामी सिनेमात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
कार्तिक आर्यन अन् करण जोहरचा वाद मिटला
करण जोहर (Karan Johar) आणि कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. पण आता हा वाद मिटला आहे. तसेच करण जोहरच्या आगामी सिनेमात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करणच्या धर्मा प्रोडक्शच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. करण आणि कार्तिकचा वाद मिटल्याने चाहते त्यांच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
करण जोहरने केली घोषणा (Karan Johar Announce Upcoming Movie)
करण जोहरने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. त्याने लिहिलं आहे,"धर्मा प्रोडक्शन आणि बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडच्या बॅनरअंतर्गत कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) स्टार आणि संदीप मोदी (Sandeep Modi) दिग्दर्शित सिनेमाची घोषणा करत आहे. कार्तिक आर्यनच्या 33 व्या वाढदिवसानिमित्त या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. चांगल्या दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने...संदीप मोदी दिग्दर्शित आणि धर्मा प्रोडक्शन आणि बालाजी मोशन फिक्चर्स निर्मित एका नव्या सिनेमावर काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. 15 ऑगस्ट 2025 रोजी हा सिनेमा रिलीज होणार असून या सिनेमात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे".
View this post on Instagram
कार्तिक आर्यनच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या.. (Kartik Aaryan Upcoming Movie)
कार्तिक आर्यन सध्या कबीर खानसोबत काम करत आहे. कबीर खानसोबत तो 'चंदू चैम्पियन' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. कबीर खान या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. कार्तिकच्या आगामी सिनेमांच्या यादीत 'कॅप्टन इंडिया' या सिनेमाचाही समावेश आहे. हंसल मेहता (Hansal Mehta) या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. 'सत्यप्रेम की कथाया सिनेमात कार्तिक शेवटचा दिसला होता. या सिनेमात तो कियारा आडवाणीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता.
संबंधित बातम्या
Kartik Aaryan : अकाऊंटमध्ये किती पैसे माहिती नाही, कार्तिकला आजही मिळतो पॉकेटमनी ; अभिनेता म्हणाला,"हॉटेलमध्ये गेलो तरी आई ओरडते"
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
