Kapoor Family Meet PM Modi: व्हेन कपूर्स मीट पीएम मोदी... सैफ-करिना, आलिया-रणबीर पंतप्रधानांच्या भेटीला; तैमूर, जेहसाठी मोदींकडून खास गिफ्ट
Kapoor Family Meet PM Narendra Modi: कपूर कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यादरम्यान करिनानं तिच्या मुलांचं ऑटोग्राफही घेतलं.
Kapoor Family Meet PM Narendra Modi: भारतीय चित्रपटांच्या (Indian Movies) इतिहासातला एक सोनेरी पान म्हणजे, राज कपूर (Raj Kapoor). 14 डिसेंबर रोजी शोमॅन राज कपूर यांची शंभरावी बर्थ अॅनिवर्सरी आहे. या निमित्तानं कपूर कुटुंबियांनी 14 डिसेंबरला आरके फिल्म फेस्टिवल ठेवलंय. या फिल्म फेस्टिवलसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) आमंत्रण देण्यासाठी 'कपूर्स' दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले होते. संपूर्ण कपूर कुटुंबीय यावेळी एकत्र दिसले. पंतप्रधान मोदी आणि कपूर कुटुंबीयांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंतप्रधान आणि कपूर फॅमिलीची भेट
आता करिना कपूर आणि नीतू कपूरनं पंतप्रधानांसोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी करिश्मा कपूर, सैफ अली खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रिद्धिमा कपूर, अदार जैन, अरमान जैन, नीतू सिंह आणि रीमा जैन यांच्यासह इतर कपूर्सही उपस्थित होते. कपूर्स आणि पंतप्रधानांमध्ये बराच वेळ गप्पा झाल्या. यावेळी पंतप्रधानांनी तैमूर आणि जेहसाठी खास गिफ्टही करिना आणि सैफकडे दिलं.
View this post on Instagram
करिनानं घेतला पंतप्रधानांचा ऑटोग्राफ
यावेळी करीना कपूरची मुलं जेह आणि तैमूर तिच्यासोबत नव्हते. पण करिनानं आपल्या मुलांसाठीही ही भेट खास बनवण्याचा विचार केला. त्यांनी जेह आणि तैमूरसाठी पीएम मोदींकडून ऑटोग्राफ घेतला. करीनानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये एका फोटोवर जेह आणि टिम लिहिलं आहे, ज्यावर पंतप्रधान ऑटोग्राफ देत आहेत. यावेळी करीना कपूर लाल रंगाच्या फ्लॉवर प्रिंट सूटमध्ये दिसली. यासोबत तिनं हेव्ही ईअरिंग्स घातले असून आपला लूक पूर्ण केला आहे. मोकळ्या केसांमध्ये आणि मॅचिंग टिकली लावून ती खूप सुंदर दिसत होती.
फोटोंमध्ये पीएम मोदी संपूर्ण कपूर कुटुंबाशी संवाद साधत आहे. फोटो शेअर करताना करिनानं लिहिलं आहे की, पीएम मोदींना आमंत्रण देताना आम्हाला खूप सन्मान वाटतो. या खास क्षणांसाठी मोदीजींचे आभार. तुमचं लक्ष आणि पाठिंबा देऊन हा माइलस्टोन साजरा करणं म्हणजे, आमचं सौभाग्य आहे.
करीना कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती यापूर्वी सिंघम अगेन चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :