Bollywood : 500 रुपये होती महिन्याची कमाई, आता एका एपिसोडचे घेतो कोट्यवधी रुपये; TV स्टार आज आहे 'कॉमेडी किंग'; ओळखलं का?
Kapil Sharma : कॉमेडी किंग कपिल शर्माला आज सर्वच जण ओळखतात. अभिनेता आणि विनोदवीराचा पहिली कमाई 500 रुपये होती. आज एका एपिसोडसाठी तो कोट्यवधी रुपये मानधन घेतो.
Kapil Sharma Fees Per Episode : लोकप्रिय विनोदवीर एकेकाळी चित्रपटांमध्ये (Movies) सहाय्यक भूमिका साकारत असेल. तसेच हा विनोदवीर स्टेज शोदेखील करत असे. पण आज काळ बदलला असून तो विनोदवीर म्हणून चांगलाच लोकप्रिय झाला आहे. आज तो सेलिब्रिटी विनोदवीर झाला आहे. मेहनतीने तो आपला शो चालवत आहे. विनोदाच्या बादशाहने एकेकाळी नोकरी केली होती. त्याचे त्याला 500 रुपये मिळाले होते. आज हा विनोदवीर एका एपिसोडसाठी कोट्यवधींचे मानधन घेतो. हा विनोदवीर दुसरा कोणी नसून कपिल शर्मा (Kapil Sharma) आहे.
कपिल शर्माचा जन्म 1981 रोजी झाला आहे. कपिल 16 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कपिलच्या घराची जबाबदारी कपिलच्या खांद्यावर आली. पैसे कमावण्यासाठी कपिल शर्मा अमृतसरमधील एका टेलीफोन बूथमध्ये काम करू लागला. कपिल शर्माची पहिली कमाई 500 रुपये होती.
'या' कार्यक्रमाने बदललं कपिल शर्माचं नशीब
शालेय शिक्षणानंतर कपिल शर्माने कॉलेजमध्ये असताना प्रायोगिक रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. त्याच्या कॉमेडी टॅलैंटचं सर्वत्र कौतुक झालं. कपिल शर्मा वयाच्या 26 व्या वर्षी 'ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज सीझन 3'मध्ये सहभागी झाला होता. कपिल शर्मा या कार्यक्रमाचा विजेता ठरला होता. या कार्यक्रमानंतर कपिल शर्माचं आयुष्य बदललं. मेहनतीच्या जोरावर तो विनोदाचा बादशाह झाला. कपिल शर्मा 2013 मध्ये 'नाइट्स विद कपिल' हा कार्यक्रम होस्ट होता. 2016 मध्ये हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर चालला. या कार्यक्रमाचं द कपिल शर्मा शो असं नाव ठेवण्यात आलं.
View this post on Instagram
'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा'च्या माध्यमातून कमावतो कोट्यवधी रुपये
कपिल शर्मा छोट्या पडद्यापासून आता ओटीटीकडे वळाला आहे. नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शो तो होस्ट करत आहे. नेहमीप्रमाणे यंदादेखील तो प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देत आहे. 192 देशांमध्ये त्याचा कार्यक्रम टेलीकास्ट होत आहे. विनोदवीर म्हणून प्रत्येक एपिसोडचे तो 5 कोटी रुपये चार्ज करत आहे. 500 रुपये पहिली कमाई असणारा कपिल शर्मा आज प्रत्येक एपिसोडचे 500 रुपये घेतो.