एक्स्प्लोर

Kantara : बॉक्स ऑफिसवर पुन्हा 'कांतारा'चा बोलबाला; सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण होताच ऋषभ शेट्टीने केली प्रीक्वलची घोषणा

Rishabh Shetty : ऋषभ भेट्टीच्या 'कांतारा' या सिनेमाने सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण केले असून लवकरच या सिनेमाचा प्रीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rishabh Shetty Announced Kantara Prequel : 'कांतारा' (Kantara) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अल्पावधीतच हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. नुकतेच या सिनेमाने सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण केले आहेत. आता सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण होताच या सिनेमाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने (Rishabh Shetty) या सिनेमाच्या प्रीक्वलची घोषणा केली आहे. 

'कांतारा'चे सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण!

'कांतारा' हा सिनेमा प्रदर्शित होऊन 100 दिवस पूर्ण झाले असले तरी चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून 'कांतारा'चा दुसरा भाग (Kantara 2) येणार असल्याची चर्चा होत होती. पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर प्रेक्षक या सिनेमाच्या सीक्वलची प्रतीक्षा करत होते. अखेर या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा न करता प्रीक्वलची घोषणा करण्यात आली आहे.

ऋषभ शेट्टीने केली 'कांतारा'च्या प्रीक्वलची घोषणा!

'कांतारा' या बहुचर्चित सिनेमाचं लेखक, दिग्दर्शन ऋषभ शेट्टीने केलं आहे. तसेच या सिनेमात त्याच्या अभिनयाची जादूदेखील पाहायला मिळाली आहे. आता या सिनेमाच्या प्रीक्वलची घोषणा करत ऋषभ शेट्टी म्हणाला,"कांतारा' या सिनेमावर प्रेम केल्याबद्दल सर्वच प्रेक्षकांचे खूप खूप आभार. तुम्ही सिनेमाला पसंती दर्शवल्यामुळे या सिनेमाने सिनेमागृहात 100 दिवसांचा टप्पा पार केला आहे". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

ऋषभ शेट्टी पुढे म्हणाला,"कांतारा' सिनेमात जे होतं तो कथानकाचा दुसरा भाग आहे. पुढील वर्षात या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कांतारा'च्या शूटिंगदरम्यानच या सिनेमाच्या प्रीक्वलबद्दल मी विचार करत होतो. सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरू आहे. लवकरच सिनेमासंदर्भात अधिक माहिती देईल". 

कांताराचे निर्माते विजय किरागंदुर म्हणाले,"कांतारा' या सिनेमाचा जॉनर थोडा वेगळा असल्याने हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमाच्या कथानकापासून शूटिंगपर्यंत सर्व गोष्टींवर या सिनेमाच्या टीमने मेहनत घेतली आहे. त्यामुळेच हा सिनेमा यशस्वी झाला. आता या सिनेमाच्या प्रीक्वलच्या तयारीला सुरुवात करत असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होईल". 

प्रेक्षक अजूनही 'कांतारा'बद्दल उत्साही असतानाच या सिनेमाच्या सिक्वेलच्या अफवांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढली आहे. सिनेमाला मिळालेल्या उदंड यशानंतर, प्रेक्षक याच्या सिक्वेलच्या घोषणेची वाट पाहत असतानाच, निर्मात्यांनी आता अखेर सिनेमाच्या प्रीक्वेलची घोषणा केली आहे.

संबंधित बातम्या

Rishab Shetty Kantara:  कांताराची सेंच्युरी; थिएटरमध्ये पूर्ण केले 100 दिवस, निर्मात्यांची खास पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget