Kangana Ranaut Slapped Case : विमानतळावर कंगनाच्या कानशिलात लगावणारी CISF ची महिला जवान आहे तरी कोण?
Kangana Ranaut Slapped Case : कंगनाच्या कानशिलात मारणाऱ्या कुलविंदर कौर या सीआयएसएफ महिला जवानाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न नेटकरी करत आहे.
Kangana Ranaut Slapped Case : बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशमधून भाजपच्या तिकिटावर निवडून लोकसभा खासदार झालेली कंगना रणौतला (Kangana Ranaut) चंदिगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने कानशिलात लगावली होती. कंगनाच्या कानशिलात लगावणाऱ्या महिला जवानला सीआयएसएफला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. कंगनाच्या कानशिलात मारणाऱ्या कुलविंदर कौर (Kulwinder Kaur) या सीआयएसएफ महिला जवानाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न नेटकरी करत आहे.
कंगनाला चंदिगड विमानतळावर मारहाण करणाऱ्या कुलविंदर कौरविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केली.
कोण आहे कुलविंदर कौर?
समोर आलेल्या वृत्तानुसार, कुलविंदर कौरची कौटुंबिक पार्श्वभूमी ही शेतकरी कुटुंबाची आहे. कुलविंदर कौरही 2009 मध्ये सीआयएसएफच्या सेवेत दाखल झाली. कुलविंदरचा पतीदेखील चंदिगड विमानतळावर कार्यरत आहे. कंगनाला कानशिलात लगावल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर कुलविंदरला सीआयएसएफमधून निलंबित करण्यात आले आहे. त्याशिवाय, तिच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे.
कुलविंदरचा सीआयएसएफमधील सेवेतील रेकोर्ड स्वच्छ असून तिच्याविरोधात कोणतीही तक्रार, दोषारोप नाहीत. कुलविंदर कौर ही मूळची पंजाबमधील सुलतानपूर लोधी येथील रहिवासी आहे. कुलविंदरही पती आणि मुलांसह मोहालीत वास्तव्य करते. कुलविंदरचा भाऊ हा शेतकरी नेता आहे.
महिला जवानाने काय म्हटले? घटनेनंतरचा व्हिडीओ समोर...
महिला जवानाने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. "माझी आई आंदोलनासाठी बसली होती, तेव्हा हिने शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य केली होती", असं कंगनाला रणौतला कानशिलात लावणारी CISF जवान कुलविंदर कौरने म्हटले.
WATCH | कंगना पर थप्पड़ मारने वाली CISF महिला जवान की वीडियो आई सामने#KanganaRanaut #Breaking #LokSabhaElection2024 #news #hindi #hindinews #latestnews #latestupdates #abpnews #india pic.twitter.com/2okrF1R9W5
— ABP News (@ABPNews) June 6, 2024
पंजाबमधील दहशतवाद आणि फुटीरतावादावर कंगनाने व्यक्त केली चिंता
घटनेनंतर कंगना रणौतचा व्हिडीओ समोर आला. कंगनाने व्हिडीओत म्हटले की, जो प्रसंग झाला, तो सेक्युरिटी चेक जवळ झाला. मी तिथून जात असताना दुसऱ्या कॅबिनमधील एक महिला होती जी सीआयएसएफची सुरक्षा कर्मचारी होती. तिने मला क्रॉस करण्याची वाट पाहिली. त्यानंतर ती माझ्यासमोर आली आणि माझ्या कानशिलात लगावली. त्यानंतर मला ती शिव्या देखील देत होती. मी तिला विचारले की, तिनं असं का केलं? तेव्हा तिने सांगितलं की, मी शेतकरी आंदोलनाला सपोर्ट करते. मला आता पंजाबमध्ये वाढणाऱ्या आंतकवादाबद्दल चिंता वाटू लागली आहे, असं कंगनाने म्हटले.