एक्स्प्लोर

रणवीर, रणबीर, अयान, विकी यांनी ड्रग चाचणीसाठी रक्ताचे नमुने द्यावेत : कंगना रणौत

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी कंगना रणौतने बॉलिवूड सेलिब्रिटींवर आरोप करण्याचं सत्र सुरूच ठेवलं आहे. अशातच आता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगलवरून कंगनाने बॉलिवूडकऱ्यांवर निशाणा साधला आहे.

मुंबई : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी कंगना रणौत बॉलिवूडमधील दिग्गजांची नावं घेऊन सतत आरोप-प्रत्यारोप करत आहे. एवढचं नाहीतर गेल्या काही दिवसांपासून कंगनाने ट्वीट करत नावानिशी आरोपांचं सत्र सुरु ठेवलं आहे. बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर, आदित्य चोप्रा आणि महेश भट्ट यांच्यासह अनेकांना मूव्ही माफिया असं संबोधत कंगनाने थेट निशाणा साधला होता. आता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगल सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर कंगनाने आता बॉलिवूडमधील ड्रग्जच्या वापरावर खुलासा केला आहे.

कंगना रणौतने पीएमओला टॅग करत एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये तिने रणवीर सिंह, विक्की कौशल, रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी यांना ड्रग टेस्टसाठी ब्लड सॅम्पल्स देण्यासाठी सांगितलं आहे. कंगनाने ट्वीट केलं आहे की, 'मी रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विक्की कौशल यांच्याकडे विनंती करते की, त्यांनी आपले ब्लड सॅम्पल्स ड्रग्ज टेस्टसाठी द्यावेत. अशी अफवा आहे की, तुम्ही सगळे कोकेनच्या आहारी गेला आहात. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही या अफवा खोट्या ठरवाव्या.'

कंगना रणौतचं ट्वीट :

कंगनाने पीएमओला केलं टॅग

कंगनाने ट्वीटमध्ये पीएमओला टॅग केलं आहे. कंगनाने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'जर या सर्व स्टार्सचे सॅम्पल्स नॉर्मल आले, तर यामुळे लाखो तरुण प्रेरित होतील.' कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की, बॉलिवूडमध्ये 99 टक्के लोक ड्रग्ज घेतात. इंडस्ट्रीच्या पार्ट्यांमध्ये खुलेआम ड्रग्स, कोकेन, गांजा इत्यादींचं सेवन खुलेआम केलं जातं. कंगनाने हा खुलासा केल्यानंतर बॉलिवूडच्या कोणत्याही सेलिब्रिटीने एकही रिअॅक्शन दिली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे.

कंगनाच्या आरोपांनंतरही बॉलिवूडचं मौन

ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी कंगनाने केलेल्या वक्तव्यावर बोलताना एवढ्या मोठ्या आरोपानंतरही बॉलिवूड गप्प का आहे, असा सवाल उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की, कंगना जर ड्रग्ज अॅडिशनचा आरोप लावत असेल तर बॉलिवूडचे सेलिब्रिटी याप्रकरणी रिअॅक्शन का देत नाहीत? महेश जेठमलानी यांच्या ट्वीटला प्रतिक्रिया देत अभिनेत्री रवीना टंडन म्हणाली की, 'प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये चांगले-वाईट लोकं असतात. पण एका खराब सफरचंदामुळे संपूर्ण टोपल्यातील सफरचंदं खराब होत नाहीत.'

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अगं बया बया बया... मैदान फुल्ल, चारही मार्ग लॉक, बीडजवळ रस्ते जाम; जरांगेंच्या भाषणाची 'अशी' सुरुवात
अगं बया बया बया... मैदान फुल्ल, चारही मार्ग लॉक, बीडजवळ रस्ते जाम; जरांगेंच्या भाषणाची 'अशी' सुरुवात
Dasara Melava 2024 : नवीन मेळावा सुरु करून भगवान गडावरील मेळाव्याची पवित्रता संपवू शकत नाही; धनंजय मुंडेंची मनोज जरांगेंवर टीका
नवीन मेळावा सुरु करून भगवान गडावरील मेळाव्याची पवित्रता संपवू शकत नाही; धनंजय मुंडेंची मनोज जरांगेंवर टीका
Manoj Jarange Patil : आमचा धक्का लागतो म्हणता, मग 17 जातींचा समावेश करून ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही का? मनोज जरांगे पाटलांची विचारणा
आमचा धक्का लागतो म्हणता, मग 17 जातींचा समावेश करून ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही का? मनोज जरांगे पाटलांची विचारणा
Manoj Jarange Patil : आपल्याला यावेळेस उलथापालथ करावीच लागेल, नारायण गडावर मनोज जरांगेंनी हुंकार भरला!
आपल्याला यावेळेस उलथापालथ करावीच लागेल, नारायण गडावर मनोज जरांगेंनी हुंकार भरला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDasara Melava : नारायणगड आणि भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी तुफान गर्दीPankaja Munde Pune : भावासोबत प्रथमच मेळावा, पंकजा मुंडेंनी सांगितली दसरा  मेळाव्याची जुनी आठवणMaybach Car Kolhapur  : दसरा मेळाव्यासाठी छत्रपती घराण्याची मेबॅक कार सज्ज #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अगं बया बया बया... मैदान फुल्ल, चारही मार्ग लॉक, बीडजवळ रस्ते जाम; जरांगेंच्या भाषणाची 'अशी' सुरुवात
अगं बया बया बया... मैदान फुल्ल, चारही मार्ग लॉक, बीडजवळ रस्ते जाम; जरांगेंच्या भाषणाची 'अशी' सुरुवात
Dasara Melava 2024 : नवीन मेळावा सुरु करून भगवान गडावरील मेळाव्याची पवित्रता संपवू शकत नाही; धनंजय मुंडेंची मनोज जरांगेंवर टीका
नवीन मेळावा सुरु करून भगवान गडावरील मेळाव्याची पवित्रता संपवू शकत नाही; धनंजय मुंडेंची मनोज जरांगेंवर टीका
Manoj Jarange Patil : आमचा धक्का लागतो म्हणता, मग 17 जातींचा समावेश करून ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही का? मनोज जरांगे पाटलांची विचारणा
आमचा धक्का लागतो म्हणता, मग 17 जातींचा समावेश करून ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही का? मनोज जरांगे पाटलांची विचारणा
Manoj Jarange Patil : आपल्याला यावेळेस उलथापालथ करावीच लागेल, नारायण गडावर मनोज जरांगेंनी हुंकार भरला!
आपल्याला यावेळेस उलथापालथ करावीच लागेल, नारायण गडावर मनोज जरांगेंनी हुंकार भरला!
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मेळाव्याला किती गर्दी?; ड्रोनशूटचे फोटो पाहून उंचावतील भुवया
मनोज जरांगेंच्या मेळाव्याला किती गर्दी?; ड्रोनशूटचे फोटो पाहून उंचावतील भुवया
Ravan Pooja : होय! महाराष्ट्रातील 'या' गावात होते चक्क रावणाची मनोभावे पूजा, अडीचशे वर्षांची परंपरा
होय! महाराष्ट्रातील 'या' गावात होते चक्क रावणाची मनोभावे पूजा, अडीचशे वर्षांची परंपरा
Hasan Mushrif : कोल्हापूरचे 'पालकमंत्री' हसन मुश्रीफ म्हणतात, हा कसला राजा हा तर भिकारी! समरजितसिंह घाटगे यांच्यावर टीका
कोल्हापूरचे 'पालकमंत्री' हसन मुश्रीफ म्हणतात, हा कसला राजा हा तर भिकारी! समरजितसिंह घाटगे यांच्यावर टीका
Dhananjay Munde: 12 वर्षांनंतर भगवान गडावरील दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे काय बोलणार? म्हणाले, 'स्टेजवर गेल्यानंतरच...'
12 वर्षांनंतर भगवान गडावरील दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे काय बोलणार? म्हणाले, 'स्टेजवर गेल्यानंतरच...'
Embed widget