Kangana Ranaut : 'या चित्रपटानं बदललं माझं जीवन'; कंगनानं सांगितला अनुभव, कोणता आहे चित्रपट?
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री (Kangana Ranaut) कंगना रनौत तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते.
Kangana Ranaut On Thalaivii: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री (Kangana Ranaut) कंगना रनौत तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. कंगनाचा अभिनय प्रेक्षकांचे लक्ष वेधतो. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता (Jayalalithaa) यांच्या जीवनावर आधारीत थलाईवी (Thalaivi) या कंगनाच्या चित्रपटला तिच्या चाहत्यांची विशेष पसंती मिळाली. कंगनाने थलाईवी चित्रपटात जयललिता यांची भूमिका साकारताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले आहे.
'थलाईवी हा चित्रपट निश्चितपणे माझं जीवनं बदलणारा चित्रपट ठरला': कंगना
एका मुलाखतीत कंगनाने सांगितलं , 'थलाईवी हा चित्रपट निश्चितपणे माझं जीवनं बदलणारा चित्रपट ठरला. कारण या चित्रपटामुळे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. जयललिता या प्रशिक्षित भरतनाट्यम डान्सर होत्या. तसेच त्या उत्तम अभिनेत्री देखील होत्या. त्यांची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही.' थलाईवी या चित्रपटाचे दिग्दर्शन एएल विजय यांनी केले. या चित्रपटात नासर, भाग्यश्री, राज अर्जुन, मधु, थम्बी रमैया, शामना कासिम आणि समुथिरकानी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 25 डिसेंबरला रात्री 8 वाजता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.
'धाकड' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस
रिपोर्टनुसार लवकरच कंगनाचा 'धाकड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 8 एप्रिल 2022 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट 20 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
कंगनाचे मानधन
एका रिपोर्टनुसार कंगना एका चित्रपटाचे 15 ते 27 कोटी रूपये मानधन घेते.
हे ही वाचा :
Bollywood Actress : आलिया, प्रियांका अन् कतरिना... एका चित्रपटासाठी एवढे मानधन घेतात 'या' अभिनेत्री
Samantha Ruth Prabhu Trolling: ट्रोलर म्हणाला, घटस्फोटीत अन् सेकंड हँड; समंथाचं उत्तर अन् बोलतीच बंद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha