एक्स्प्लोर

Kangana Ranaut : राहुल गांधींनी 'टॉम अँड जेरी' बघणं सोडलं तर माझा सिनेमा आवडेल, कंगना रणौत असं का म्हणाली?

Kangana Ranaut :  कंगनाचा इमर्जन्सी हा सिनेमा राहुल गांधी यांना आवडेल का? यावर आता कंगना रणौतची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. 

Kangana Ranaut :  अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही आता इमर्जन्सी या सिनेमामुळे चर्चेत आलेली आहे. तिच्या या सिनेमामुळे बराच वादंगही निर्माण झाला असल्याचं पाहायला मिळतंय. काहीच दिवसांपूर्वी कंगनाने भारतीय जनता पक्षात प्रवेश करत राजकारणातही एन्ट्री घेतली. त्यानंतर आता तिचा इंदिरा गांधी यांच्यावरील सिनेमा येणं, यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं. दरम्यान कंगनाचा हा सिनेमा गांधी कुटुंबाला आणि विशेषत: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आवडेल का असा प्ऱस्न वारंवार उपस्थित केला जातोय. 

या प्रश्नावर आता कंगनाने 'आप की अदालत'मध्ये उत्तर दिलं आहे. तिच्या उत्तरामुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. याआधीही एका मुलाखतीदरम्यान राहुल गांधी यांना माझा ही सिनेमा नक्की आवडेल आणि त्यांना अभिमानही वाटेल असं वक्तव्य तिने केलं होतं. त्याच आधारावर तिला प्रश्न विचारण्यात आला होता. पण त्यावर कंगनाने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं असल्याचं पाहायला मिळालं आहे. 

'त्यांनी कार्टून बघणं सोडलं तर...'

तुझा हा सिनेमा राहुल गांधी यांना आवडेल का? यावर उत्तर देताना कंगनाने म्हटलं की, राहुल गांधी जर घरी जाऊन टॉम अँड जेरी बघत असतील तर त्यांना हा सिनेमा कसा समजेल. मला असं वाटतं की, मी इथला राजकुमार आहे, भारत देश हा माझा आज्जीचा आहे, ही वृत्ती, ही भाषा त्यांनी सोडायला हवी. अशा प्रकारची भाषा जर त्यांनी सोडली नाही तर ते आयुष्यभर कार्टुन म्हणूनच राहतील,  त्यामुळे आता यावर काँग्रेसकडून कंगनाला काय उत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्याचप्रमाणे राहुल गांधी कंगनाचा हा सिनेमा पाहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

'मला स्वत:ला या लोकांची घृणा वाटली असती'

पुढे कंगनाने म्हटलं की,  'कोणताही नेता हा नेताच असतो, त्यामध्ये त्याच्या आज्जीचा वैगरे काहीही संबंध नसतो. ही कोणत्याप्रकारची ओळख असते. त्यांच्याकडचे बरेच लोक असंही म्हणतायत की, स्वत:चं दुकान चालवण्यासाठी आता माझी आज्जी झालीये. त्यांची अशी वक्तव्य ऐकल्यानंतर मला असं वाटतं की, बरं झालं मी भारतीय जनता पक्षात आहे नाहीतर मला स्वत:ला या लोकांची घृणा वाटली असती.' 

ही बातमी वाचा : 

Mahesh Manjarekar : 'लोकांनाच तो पाहायचा नाही, कंटेंटच्याही बाबतीत बोंबच'; महेश मांजरेकरांनी मांडली मराठी सिनेमांची व्यथा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raosaheb Danve : दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
Maval Assembly constituency: मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
Nashik Crime News : नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur संघावर बंदी लादण्याची स्वप्नं पाहू नयेत : विहिंप महाराष्ट्र, गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडेTOP 100 Headlines : Maharashtra Vidhan Sabha : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Nov 2024Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का?  संजय राऊत कडाडलेDevendra Fadnavis Vs Asaduddin Owaisi : रझाकारांच्या सरकारचं स्वप्न गाडू, फडणवीसांची ओवैसींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raosaheb Danve : दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
Maval Assembly constituency: मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
Nashik Crime News : नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Sanjay Raut: राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; संजय राऊत कडाडले
राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; संजय राऊत कडाडले
Kartiki Ekadashi 2024 Wishes : कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता फक्त खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची घणाघाती टीका
उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची टीका
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
Embed widget