एक्स्प्लोर

Farm Laws Repeal: कृषी कायदे रद्द करणं दुर्दैवी, हा काळा दिवस, कायद्याच्या समर्थकांच्या तीव्र प्रतिक्रिया

Farm Laws Repeal: पंतप्रधान मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.एकीकडे निर्णयाचे स्वागत होत आहे तर दुसरीकडे मात्र हा निर्णय चुकीचा असल्याचं कायद्याच्या समर्थकांनी म्हटलं आहे. 

Farm Laws Repeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढं अखेर सरकारला झुकावं लागलं आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.  या निर्णयानंतर एकीकडे निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे तर दुसरीकडे मात्र हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हणत हा काळा दिवस असल्याच्या प्रतिक्रिया कायद्याच्या समर्थकांनी दिल्या आहेत. 

Farmers Protest : बळीराजापुढं सरकार नमलं; 359 दिवसांचा लढा यशस्वी, ऐतिहासिक आंदोलनातील महत्त्वाचे टप्पे 

सरकार काही शेतकऱ्यांच्या दबावाला बळी पडले- अनिल घनवट
या निर्णयाचे देशभर स्वागत होत असताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी स्थापन केलेल्या कमिटीचे सदस्य अनिल घनवट यांनी मात्र पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला निर्णय दुर्भाग्यपूर्ण आणि शेतकऱ्यांचे नुकसान करणारा असल्याचे म्हंटले आहे. सरकार काही शेतकऱ्यांच्या दबावाला बळी पडले असून त्यांच्या समोर सरकारने गुढगे टेकवले आहे असा आरोप करत हे कायदे मागे घेणे हा मार्ग नव्हता तर त्यात काही सुधारणा आवश्यक होत्या, त्या करून कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे होते असे घनवट यांनी म्हंटले आहे. कृषी कायद्याच्या बाबतीत फक्त राजकारण सुरू असून शेतकऱ्यांशी कोणाला देणंघेणं नाहीये आणि ही गोष्ट शेतकऱ्यांच्या नुकसानीची असेल असेही घनवट यांनी म्हणलं आहे.

Farm Laws : बळीराजाच्या आंदोलनाला मोठं यश, कृषी कायदे अखेर रद्द, काय होते कायदे आणि आक्षेप

राजकारण जिंकलं आणि शेतकरी हरले- सरोज काशीकर
शेतकरी संघटनेच्या माजी अध्यक्ष तथा माजी आमदार सरोज काशीकर यांनी  म्हटलं आहे की, कृषी कायदे रद्द करणे ही बाब दुर्दैवी आहे. राजकारण जिंकलं आणि शेतकरी हरले, असंच यावेळी म्हणावं लागेल. ते दुरदर्शीपणे शेतकरी हिताचे होते. शेतकरी आंदोलनाने शेतकऱ्यांचा घात केला. सर्व राजकीय पक्षांनी मिळून शेतकऱ्यांचा घात केला. या घटनेचा निषेध करतो. जुजबी सुधारणा करून हे कायदे अमलात आणायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया सरोज काशीकर यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस काळा दिवस - सदाभाऊ खोत
शेतकरी नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस काळा दिवस आहे. आज शेतकऱ्याला मिळालेल्या स्वतंत्र हे संपुष्टात आलं, शेतकरी पारतंत्र्यात गेला. शेतकऱ्यांना जे या कायद्याने स्वातंत्र्य मिळणार होते ते हिरावून घेतले. मूठभर दलाल आडती हे आज जिंकले, पण दलालच्या तावडीतून सुटू इच्छिणारा शेतकरी मात्र हारला, त्याचा पराभव झाला आहे. पंजाब हरियाणा, उत्तर प्रदेश शेतकरी मार्केट कमिटी भोवती बाजारपेठ फिरत असते, त्यांच्या टक्केवारी मिळते. कोट्यवधी रुपयांचा यात भ्रष्टाचार होत आहे, त्यांना आता संधी मिळाली. कृषी कायदे मागे घेतल्याने आता लुटणाऱ्यांना यांना सुगीचे दिवस आले असे म्हणता येईल आणि  शेतकऱ्यांना मात्र गळफास आला असल्याची प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

तिन्ही कृषी कायदे परत घेण्याचा निर्णय चूक - भारतीय किसान संघ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली असली, तरी हे देशातील लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी चुकीचा निर्णय झाल्याचे मत भारतीय किसान संघाने व्यक्त केले आहे. देशातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही, तर दिल्लीच्या सीमेवर आंदोलनावर बसलेल्या मूठभर शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आरोप ही भारतीय किसान संघानं केला आहे. तिन्ही कृषी कायदे देशातील सर्व शेतकऱ्यांना मान्य व्हावे यासाठी त्यामध्ये चार दुरुस्त्या भारतीय किसान संघाने सुचवल्या होत्या, मात्र केंद्र सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. आता पंतप्रधानांनी पुढील निर्णय घेण्यासाठी ज्या एक्सपर्ट समितीची घोषणा केली आहे.. त्या समितीत  अराजकीय लोकांना म्हणजेच शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रतिनिधींना तसेच शेतीविषयक अर्थव्यवस्थेच्या जाणकारांना प्रतिनिधित्व द्यावं अशी अपेक्षाही भारतीय किसान संघाने व्यक्त केली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी...
पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्‍यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमांतून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही, असे पंतप्रधान म्हणाले. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो. महिनाअखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान तो संसदेद्वारे मागे घेतला जाईल, असे पंतप्रधान म्हणाले.

काय होते तीन कृषी कायदे 

पहिला कायदा 
शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020  

दुसरा कायदा 
शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020 

तिसरा कायदा - अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020 

महत्त्वाच्या बातम्या

मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार

व्हिडीओ

OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
Pakistan Cricket : भारताला वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटनं पराभूत करताच पाकिस्तान क्रिकेटची बर्बादी सुरु,पाकच्या माजी क्रिकेटपटूनं धक्कादायक वास्तव मांडलं 
भारतावर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटची वाट लागली, पाकच्या माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो

Embed widget