Kangana Ranaut : कंगना रनौत पुन्हा बरळली; "राजकारणापासून दूर राहा"; बॉलिवूडकरांवर साधला निशाणा
Kangana Ranaut : बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रनौतने ट्वीट करत बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे.
Kangana Ranaut On Bollywood : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathan) हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) ट्विटरवर परतली असून 'पठाण' सिनेमासंदर्भात सलग ट्वीट करत आहे. आता कंगनाने ट्वीट करत बॉलिवूडकरांवर निशाणा साधला आहे.
आलिया भट्टपासून करण जौहरपर्यंत अनेक सेलिब्रिटी 'पठाण' सिनेमाचं आणि शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. आता या बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधत कंगनाने लिहिलं आहे,"बॉलिवूडकरांनो 'द्वेषावर विजय' असं जर मी पुन्हा ऐकलं तर मला पुन्हा एकदा तुमची शाळा घ्यावी लागेल. तुम्ही चांगलं काम करा आणि तुमच्या यशाचा आनंद घ्या. राजकारणापासून दूर राहा".
Bollywood walon yeh narrative banane ki koshish mat karna ki iss desh mein tum Hindu hate se suffer kar rahe ho, agar maine phir se yeh word suna ‘triumph over hate’ toh tum logon ki wahi class lagegi jo kal lagi thi, enjoy your success and do good work, stay away from politics.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 28, 2023
'पठाण' सारखे सिनेमे चालायला हवे : कंगना रनौत
कंगना रनौत याआधी 'पठाण'च्या यशाबद्दल बोलताना म्हणाली,"पठाण' एक चांगला सिनेमा आहे. अशा पद्धतीचे सिनेमे चालायला हवेत. प्रत्येकाच्या आवडीनुसार सिनेमा बनवण्याचा विचार हिंदी सिनेसृष्टीतील मंडळी करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत हिंदी सिनेसृष्टी पुन्हा एकदा बहरेल".
कंगनाचा 'धाकड' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला होता. यावर ट्वीट करत एका यूजरने लिहिलं आहे,"कंगना जी. 'धाकड'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 55 लाखांची कमाई केली होती. तर या सिनेमाने फक्त 2.58 कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे शाहरुखच्या 'पठाण'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. निराशा तर झालीच असेल".
कंगना उत्तर देत म्हणाली आहे,"मी मान्य करते 'धाकड' हा सिनेमा फ्लॉप ठरला होता. पण एसआरकेचा गेल्या दहा वर्षात सुपरहिट होणारा हा पहिलाच सिनेमा आहे. ही गोष्ट आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. भारतीय सिनेरसिकांनी आज शाहरुखला पाठिंबा दिला आहे. उद्या आम्हाला देतील. भारत महान आहे. जय श्री राम".
संबंधित बातम्या