एक्स्प्लोर

Kalki 2898 AD Trailer : प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी'चा ट्रेलर रिलीज; आता प्रेक्षकांना फक्त चित्रपटाची प्रतीक्षा

Kalki 2898 AD Trailer Out : 'कल्कि 2898 एडी' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Kalki 2898 AD Trailer Out : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) 'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2024 च्या बहुप्रतीक्षित चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश आहे. चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. आता ट्रेलर रिलीज झाल्याने चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'कल्कि 2898 एडी'च्या ट्रेलरमध्ये प्रभास, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), दिशा पाटनी (Disha Patni) या कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. 

ट्रेलरमध्ये झळकलेल्या सर्वांनीच उत्तम काम केलं आहे. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरमधील प्रत्येक सीन जबरदस्त आहे. 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटात प्रचंड वीएफएक्स असणार असल्याचा ट्रेलरवरुन अंदाज येत आहे. एकंदरीत प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, दिशा पाटनी यांचा 'कल्कि 2898 एडी' हा चित्रपट खूप खास आहे.

'कल्कि 2898 एडी'च्या ट्रेलरचं होतंय कौतुक

'कल्कि 2898 एडी'च्या ट्रेलरच्या सुरुवातीला काशी नगरी पाहायला मिळत आहे. तसेच अमिताभ बच्चनदेखील दिसून येत आहे. पुढे दीपिका पादुकोणची झलक पाहायला मिळते. त्यानंतर प्रभासची दमदार एन्ट्री होते. कमल हासनच्या झलकने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटाच्या गोष्टीत महाभारताचे काही भाग दाखवले जाणार आहेत. चित्रपटात अश्वत्थामाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन दिसून येणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमधील प्रत्येक सीन धमाकेदार आहे. चित्रपटात जास्त प्रमाणात वीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. 'कल्कि 2898 एडी'चा ट्रेलर पाहून चाहते आता सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याची प्रतीक्षा करत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Prabhas (@actorprabhas)

'कल्कि 2898 एडी' कधी प्रदर्शित होणार? (Kalki 2898 Ad Release Date)

'कल्कि 2898 एडी' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नाग अश्विनने सांभाळली आहे. प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, दिशा पाटनी आणि कमल हासन हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'कल्कि 2898 एडी' हा चित्रपट 27 जून 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. देशासह परदेशातील मंडळीदेखील या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. यूएसएमध्ये या चित्रपटाचं जबरदस्त अॅडव्हान्स बुकिंग होत आहे.

संबंधित बातम्या

South Superstars : प्रभास ते अल्लू अर्जुन, रजनीकांत ते कमल हासनपर्यंत; 'या' सहा दाक्षिणात्य सुपरस्टार्सचं मानधन ऐकूण व्हाल अवाक्

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोलBala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषणABP Majha Headlines : 01 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRahul Gandhi Mumbai PC : धारावी ते अदानी; मुंबईच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Embed widget