Kalki 2898 AD Box Office Collection Day 20 : प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'ने बॉक्स ऑफिस गाजवलं, 20 दिवसात बंपर कमाई, अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले...
Kalki 2898 AD Box Office Collection Day 20 : पहिल्या दिवसापासून चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. 20 व्या दिवशी म्हणजे मंगळवारी तिकिटबारीवर 'कल्की'चा जोर दिसून आला.
Kalki 2898 AD Box Office Collection : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), प्रभास (Prabhas) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांसारख्या दिग्गज कलाकारांची भूमिका असलेला 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगलंच गाजवलं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी बॉक्स ऑफिसवर इतकी रेकोर्डब्रेक कमाई कोणत्याही चित्रपटाला करता आली नाही. काही मोजकेच चित्रपट हिट ठरले. 'कल्की 2898 एडी'ने सर्व उणिवा एकत्र भरून काढल्या आहेत. पहिल्या दिवसापासून चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. 20 व्या दिवशी म्हणजे मंगळवारी तिकिटबारीवर 'कल्की'चा जोर दिसून आला.
'कल्की 2898 एडी'ने कमाईच्या बाबतीत 'जवान'ला मागे टाकण्यासाठी अजून 60 कोटी रुपये कमवावे लागणार आहे. 'बॅड न्यूज'या चित्रपटामुळे या कल्कीच्या कमाईवर फारसा परिणाम झाला नाही तर या वीकेंडपर्यंत चित्रपट हा आकडा नक्कीच पार करेल असा अंदाज आहे.
'बाहुबली 2'ने 1030.42 कोटी, 'KGF 2'ने 859.7 कोटी, RRR ने 782.2 कोटी, 'जवान'ने 640.25 कोटींची कमाई केली आहे. विकी कौशलचा 'बॅड न्यूज' हा चित्रपट 19 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट काहीसा वेगळ्या जॉनरचा असल्याने 'कल्की'ला आता तिकिटबारीवर किती आव्हान मिळेल, हे रिलीजनंतरच स्पष्ट होणार आहे.
View this post on Instagram
20 दिवसांत कल्कीने केली 588 कोटींची कमाई
या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 414.85 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात 'कल्की 2898 एडी'चे कलेक्शन 128.5 कोटी होते. रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. सॅनसिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने मंगळवारी 4.25 कोटींची कमाई केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या कमाईच्या आकड्यात काही प्रमाणात फरक पडू शकतो.
जगभरात 960 कोटींची कमाई...
'कल्की 2898 एडी'ने भारतातच नव्हे तर जगभरातही चांगली कमाई केली आहे. परदेशातील थिएटरमध्ये कल्कीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मागील 19 दिवसांत चित्रपटाने सुमारे 951 कोटींची कमाई केली होती. आता, 20 व्या दिवशीच्या कलेक्शनंतर हा वर्ल्डवाईड कमाईचा आकडा हा 960 कोटींपर्यंत गेला असण्याचा अंदाज आहे.
मल्टीस्टारर 'कल्की 2898 एडी' या चित्रपटासाठी 600 कोटींचा खर्च झाल्याची चर्चा आहे. आता हा निर्मिती खर्च जवळपास वसूल होत आला आहे. त्यातच या चित्रपटाने ओटीटी हक्क, सॅटेलाईट प्रसारणासाठी मोठी डील केल्याचे म्हटले जात आहे.