एक्स्प्लोर

Juhi Chawla:  ड्रग्स प्रकरणादरम्यान जुही चावलानं केली होती आर्यन खानची मदत ; अभिनेत्री म्हणाली, 'मला वाटले की...'

मुंबईच्या सत्र न्यायालयात आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणी जुहीनं (Juhi Chawla) एक लाख रुपयांच्या बाँडवर सही केली होती.

Juhi Chawla:  अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) ही शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणावेळी खान कुटुंबाच्या पाठीशी उभी राहिली. आर्यन खानच्या सुटकेसाठी जुही चावला ही जामीनदार म्हणून कोर्टात दाखल झाली होती. मुंबईच्या सत्र न्यायालयात आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणी जुहीनं एक लाख रुपयांच्या बाँडवर सही केली. त्यानंतर आर्यन खान तुरुंगातून सुटला. एका मुलाखतीत जुहीनं आर्यनला केलेल्या मदतीबाबत सांगितलं.

एका मुलाखतीमध्ये जुहीनं आर्यन आणि शाहरुखला केलेल्या मदतीबद्दल सांगितलं, 'हे सर्व घडणार आहे हे आम्हाला माहित नव्हते पण जेव्हा ते घडले तेव्हा मला वाटले की, मी मदत करू शकते. मला वाटले की मी तेव्हा त्याच्याबरोबर असणे योग्य आहे.'

जुहीनं पुढे सांगितलं की, शाहरुखसोबत तिची खूप दिवसांपासून मैत्री असली तरी ते दोघे क्वचितच भेटतात. जुही म्हणाली की,  तिचा पती जय मेहता हा  शाहरुखच्या संपर्कात असतो. 

शाहरुख आणि जुहीचे चित्रपट

फिर भी दिल है हिंदुस्तानी, डर या चित्रपटांमध्ये जुही आणि शाहरुखनं काम केलं.  शाहरुख आणि जुहीची केकेआर ही आयपीएल टीम देखील आहे. जूही चावला आणि शाहरुख खान ही 90 च्या दशकातील  फेमस ऑन-स्क्रीन जोडी होती. दोघांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

आर्यन खानला ऑक्टोबर 2021 मध्ये क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. नंतर त्याला क्लीनचिट मिळाली. या सर्व प्रकरणावर गौरी खाननं कॉफी विथ करण या शोमध्ये प्रतिक्रिया दिली होती. 'कठीण काळात आमचे मित्र आणि अनेक लोक एकत्र उभे राहिले ज्यांना आम्ही ओळखत नाही ते लोक देखील आमच्यासोबत होते. आम्हाला यासाठी ज्यांनी मदत केली, त्यांचे मी आभार मानते.' असं गौरीनं या कार्यक्रमामध्ये सांगितलं. 

आर्यन खानचा नवा प्रोजेक्ट

आर्यन लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी आर्यननं या नव्या प्रोजेक्टची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यानं क्लॅप बोर्ड आणि स्क्रिप्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टला त्यानं कॅप्शन दिलं, 'लिखाण झालं आहे, आता अॅक्शन म्हणायची वाट बघत आहे' आर्यनच्या या पोस्टला कमेंट्स करुन अनेकांनी त्याच्या आगमी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या. गौरी खान, रितेश देशमुख आणि शाहरुख खान यांनी आर्यनच्या या पोस्टला कमेंट केल्या. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Aaryan Khan: आर्यन खानला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'पोलिसांनी एवढं धुतलं की...'

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget