Jr NTR: ज्युनियर एनटीआरचे चाहते जपानमध्येही; लाडक्या अभिनेत्याला दिले खास सरप्राईज! पाहा व्हिडीओ..
जपानमधील हॉटेलमध्ये पोहोचताच ज्युनियर एनटीआरला त्याच्या चाहतीनं जबरदस्त सरप्राईज दिलं.
Jr NTR: प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटानं केवळ देशातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवली. या चित्रपटामधील कलाकारांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या चित्रपटात अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि अभिनेता ज्युनियर एनटीआर (Jr NTR) यांनी प्रमुख भूमिका साकारली. हे दोघे सध्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी जपानमध्ये गेले आहेत. या दरम्यान ज्युनियर एनटीआरच्या एका फॅननं त्याला खास गिफ्ट दिलं आहे.
जपानमधील हॉटेलमध्ये पोहोचताच ज्युनियर एनटीआरला त्याच्या चाहतीनं जबरदस्त सरप्राईज दिलं. ज्युनियर एनटीआरचं स्वागत करणाऱ्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला एक सुंदर कार्ड भेट म्हणून दिली. या कार्डवर खास संदेश लिहिलेला आहे. हा संदेश हिंदी भाषेमध्ये लिहिण्यात आला होता. व्हिडीओमध्ये ज्युनियर एनटीआर हा फॅननं दिलेल्या भेटवस्तूचं कौतुक करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये ज्युनियर एनटीआर हा सर्वांचे आभार मानताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
Tokyo led by daiheart fan of #jrntr and give a card Wellcomeing him#RRRInJapan #rrr pic.twitter.com/gWn5Fp1345
— Bejawada.Gayathri_ntr99993 (@BajawadaGayatri) October 19, 2022
राम चरण देखील सध्या जपानमध्ये आहे. राज चरणची पत्नी उपासनानं जपानमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिनं जपानमधील काही पदार्थांचे फोटो शेअर केले होते.
तेलुगु पीरियड ड्रामा 'RRR' ने या वर्षाच्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. हा सिनेमा 25 मार्च रोजी सिनेमागृहात रिलीज झाला. 'आरआरआर' हा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाने जगभरात तब्बल 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 1000 कोटींचा व्यवसाय करूनही 'आरआरआर'ची क्रेझ अद्याप थांबली नाही. हा चित्रपट नंतर नेटफ्लिक्स या ओटीटीवर देखील रिलीज झाला. ओटीटीवर देखील या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
ज्युनियर एनटीआरचे आगामी चित्रपट
‘NTR30’ ज्युनियर एनटीआरचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एनटीआरच्या या नवीन चित्रपटाचे दिग्दर्शन कोर्टाला शिवा करणार आहेत. अभिनेता एनटीआर आणि कोर्टाला एकत्र काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2016 मध्ये 'जनता गॅरेज' या चित्रपटाचे दिग्दर्शनही कोर्टाला सिवा यांनी केले होते आणि हा चित्रपट यशस्वी ठरला होता.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: