'द कश्मीर फाईल्स'सारख्या चित्रपटांना प्रेक्षक मिळतो हे भयावह; जॉन अब्राहम 'छावा'वरही परखड बोलला
उजव्या विचारसरणीच्या चित्रपटांवरुन आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. मी कधीच छावा किंवा द काश्मीर फाईल्स यांसारखे चित्रपट बनवणार नाही.

मुंबई : आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि अॅक्शन हिरो म्हणून बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीजमध्ये नाव कमावेलल्या अभिनेता जॉन अब्राहमने (John abraham) आपला स्वतंत्र चाहता वर्ग तयार केला आहे. त्यामुळेच, त्याच्या चित्रपटांनाही बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला कमावता आला आहे. जॉन आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येत असून तेहरान ही त्याची वेब सिरीज 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. 2012 साली इस्रायली राजकीय नेत्यांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भावर आधारित ही कथा आहे. त्याच अनुषंगाने जॉन अब्राहमने दिलेल्या एका मुलाखतीत द काश्मीर फाईल्स सिनेमा आणि उजव्या विचारणीवरुन भीती व्यक्त केली आहे.
उजव्या विचारसरणीच्या चित्रपटांवरुन आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. मी कधीच छावा किंवा द काश्मीर फाईल्स यांसारखे चित्रपट बनवणार नाही. अशा चित्रपटांमुळे प्रेक्षकांवर कट्टरवादाचा प्रभाव पडतो, जो भयावह असल्याचे जॉनने म्हटले. ध्रुवीकरण करण्यासाठी बनवलेल्या काश्मीर फाइल्ससारख्या उजव्या विचारसरणीच्या चित्रपटांना प्रेक्षक मिळतात तेव्हा ते भयानक असते. मला असे चित्रपट बनवण्याचा मोह कधीच झाला नाही, आणि मी हे चित्रपट कधीच करणार नाही, असे जॉन अब्राहमने मुलाखतीत स्पष्ट केले. दरम्यान, 2022 मध्ये प्रदर्शित झालेला द काश्मीर फाईल्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या सिनेमाने देशात 252 कोटींचा गल्ला जमवला तर जगभरातील कमाई 341 कोटी एवढी आहे. काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारावर आणि त्यांना काश्मीर सोडून बाहेर जाण्यास भाग पाडल्याचं दाखवणारा हा चित्रपट आहे. तर, छावा सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. महाराष्टासह देशभरात छावा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. अभिनेता विकी कौशलने या चित्रपटात छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारली होती. संभाजीराजेंच्या शौर्य आणि बलिदानाची कथा या चित्रपटातून साकारण्यात आली आहे.
मी अराजकीय आहे
चित्रपटांना सेन्सॉरशीप असायला हवी, मात्र ज्या पद्धतीने या सेन्सॉरशीपला नियंत्रित करण्यात येत आहे. त्यावरुन, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सेंन्सॉर बोर्डाबाबत विचारले असता, ते आमच्यासोबत नेहमीच चांगले राहिले आहेत असे जॉनने म्हटले. मी दक्षिणपंथी किंवा डाव्या विचारसरणीचा नाही, मी अराजकीय आहे, असेही त्याने स्पष्ट केले. दाक्षिणात्य चित्रपटांना ज्याप्रकारे चाहत्यांचं प्रेम मिळतं, प्रेक्षकवर्ग मिळतो तो आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. एक चित्रपट निर्माता म्हणून मी व्यवसायिक दृष्टीकोनापेक्षा आपल्या मतावर ठाम राहणे पसंत करतो, असेही अभिनेत्याने म्हटले.
हेही वाचा
बाप-मुलाच्या धमाल नात्याची झलक दाखवणारं गाणं 'आवशीचो घो'; 'दशावतार'मधील पहिलं गाणं प्रदर्शित

























