एक्स्प्लोर

Upcoming Marathi Movie Dashavatar: बाप-मुलाच्या धमाल नात्याची झलक दाखवणारं गाणं 'आवशीचो घो'; 'दशावतार'मधील पहिलं गाणं प्रदर्शित

Upcoming Marathi Movie Dashavatar: दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं, वडील आणि मुलामधील नात्याचं एक अजब रसायन दाखवणारं आहे.

Upcoming Marathi Movie Dashavatar: सध्या सर्वत्र चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांच्या प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरलेला 'दशावतार' (Dashavatar Marathi Movie) हा मराठी चित्रपट लवकरच म्हणजेच, 12 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. झी स्टुडिओज (Zee Studios) प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या भव्य चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे यांचा अप्रतिम अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टर आणि टीझरनं प्रेक्षकांमध्ये आधीच प्रचंड उत्सुकता निर्माण केली असतानाच, आता या चित्रपटातील पहिलं गाणं 'आवशीचो घो' नुकतंच प्रदर्शित झालं असून या आगळ्यावेगळ्या गाण्यानं कोकणच्या मातीचा गंध सोबत आणला आहे. अनेकांना शिवी वाटणारा हा शब्द खरंतर लाडानं वापरला जाणारा शब्द आहे. मालवणी भाषेत आईला प्रेमानं आवशी आणि नवऱ्याला घो  असं म्हणतात. म्हणूनच आईच्या नवऱ्याला म्हणजेच, वडीलांना प्रेमाने 'आवशीचो घो' म्हणायची पद्धत आहे. 'दशावतार' चित्रपटातलं हे गाणं सुद्धा बाप आणि मुलाच्या अनोख्या नात्याबद्दल आहे.

दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं, वडील आणि मुलामधील नात्याचं एक अजब रसायन दाखवणारं आहे. हे गाणं वर वर पाहता मिश्किल किंवा गंमतीशीर वाटत असलं तरी ते गाणं बाप - मुलाच्या नात्याचं सारच मांडतं. विशेष म्हणजे, यात कधी कधी मुलगा वडिलांची जबाबदारी घेणारा 'वडील' बनतो आणि वडील त्याचे 'मूल' होतात. बाप मुलाच्या नात्याचं हळूवारपण उलगडणारं हे गाणं गुरु ठाकूरच्या समृद्ध लेखणीतून उतरलं असून, संगीत दिग्दर्शक ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर ओंकारस्वरुप यानं ते गायलं आहे. 

या गीताबद्दल गीतकार गुरु ठाकूर म्हणतात की, "बाप आणि मुलगा यांच्यातील मैत्रीचं नातं मिश्किल आणि खट्याळ अंदाजात सादर करणारं गाणं आजवर कधीच झालं नव्हतं. 'आवशीचो घो' या गाण्यामुळे ते लिहिण्याची संधी मला मिळाली. मालवणी बोलीतील शब्दांचा गोडवा, ए. व्ही. यांच्या संगीताची जादू आणि पडद्यावर दिलीपजी आणि सिद्धार्थ यांचा अफलातून परफॉर्मन्स यांनी या गाण्याला वेगळं परिमाण दिलं आहे."

चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणतात, "आवशीचो घो' हे गाणं वडील-मुलामधील नात्याची वीण अत्यंत लोभसपणे अधोरेखित करतं. हे गाणं प्रत्येकाला आपल्या वडिलांच्या जवळ नेणारं, आणि हसताहसताही प्रत्येकाच्या मनाला भिडणारं असं हे गाणं आहे. वडील मुलाच्या नात्यातील प्रेम, ताण, समज-गैरसमज आणि काळानुसार बदलणारी जबाबदारी हे सगळं या एका गाण्यातून सहजतेने दाखवणं हे मोठं आव्हान होतं. परंतु गुरु ठाकूर, ए व्ही प्रफुल्लचंद्र आणि गायक ओंकार स्वरूप या सगळ्या टीमने ते उत्तमरित्या पार पाडलं. पडद्यावरही ते नातं सिद्धार्थ मेनन आणि दिलीप प्रभावळकर यांच्या केमिस्ट्रीतून कमाल उतरलंय!"

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले, "दशावतार'मध्ये प्रेक्षकांना भावनिक आणि कलात्मक अशा विविध थरांवरचा अनुभव मिळणार आहे. 'आवशीचो घो' हे गाणं या प्रवासातील एक भावपूर्ण वळण आहे. संगीत, शब्द आणि अभिनयाचं कमाल सादरीकरण यामुळे हे गाणं सर्व वयोगटांसाठी रिलेटेबल ठरणारं आहे." 

निर्माते सुजय हांडे म्हणतात, "जेव्हा आम्ही हे गाणं प्लॅन केलं, तेव्हा आमचा उद्देश फक्त धमाल गाणं देणं हा नव्हता तर नात्यांची गुंतागुंत आणि सहजता दाखवणं होता. दिलीपजी आणि सिद्धार्थ यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांनी याला वेगळ्या उंचीवर नेलं आहे."

'दशावतार'चा टीझर पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. आता 'आवशीचो घो' गाण्यानं या चित्रपटातील भावनिक बाजूही उलगडायला सुरुवात झाली आहे. धमाल आणि हृदयस्पर्शी भावनांचं हे सुंदर मिश्रण प्रेक्षकांना नक्की भावेल, अशी आशा आहे.

पाहा गाणं : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
Beed Crime News: बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
Local Bodies OBC Reservation: राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
Smriti Mandhana, Palash Muchhal Net Worth: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल, नेटवर्थच्या बाबतीत एकमेकांच्या तोडीस तोड; महिन्याभरात किती कमावतात?
स्मृती मानधना की पलाश मुच्छल, कुणाकडे सर्वाधिक बँक बॅलेन्स? दोघांचं नेटवर्थ किती?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण
TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्या : 26 Nov 2025 : ABP Majha
Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
Beed Crime News: बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
Local Bodies OBC Reservation: राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
Smriti Mandhana, Palash Muchhal Net Worth: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल, नेटवर्थच्या बाबतीत एकमेकांच्या तोडीस तोड; महिन्याभरात किती कमावतात?
स्मृती मानधना की पलाश मुच्छल, कुणाकडे सर्वाधिक बँक बॅलेन्स? दोघांचं नेटवर्थ किती?
Phaltan Accident: भरधाव वेगात कंट्रोल सुटला, मिनी ट्रॅव्हल्स अक्षरश: हवेत उडून डिव्हायडरवर धडकली, फलटणमध्ये भीषण अपघात, एकाला चिरडलं
भरधाव वेगात कंट्रोल सुटला, मिनी ट्रॅव्हल्स अक्षरश: हवेत उडून डिव्हायडरवर धडकली, फलटणमध्ये भीषण अपघात, एकाला चिरडलं
केक कापला, अंडी अन् दगड फेकलंत, नंतर बर्थडे बॉयवर पेट्रोल टाकून....; कुर्ल्यात वाढदिवसात मस्करीची कुस्करी, पाच मित्रांना बेड्या
केक कापला, अंडी अन् दगड फेकलंत, नंतर बर्थडे बॉयवर पेट्रोल टाकून....; कुर्ल्यात वाढदिवसात मस्करीची कुस्करी, पाच मित्रांना बेड्या
Palash Muchhal and Mary Dcosata: पलाश मुच्छल अन् मेरी डिकॉस्टाचं अफेअर? मोबाईलवरचं  सिक्रेट चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल
पलाश मुच्छल अन् मेरी डिकॉस्टाचं अफेअर? मोबाईलवरचं सिक्रेट चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल
Nagpur Crime BJP : नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget