Jaya Prada On Rajesh Khanna : राजेश खन्ना सेटवर नेहमी उशीरा यायचे; 'द कपिल शर्मा'शोमध्ये जया प्रदा म्हणाल्या...
Jaya Prada : राजेश खन्नाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने अनेक सुपरहिट सिनेमात काम केलं आहे.
Jaya Prada On Rajesh Khanna : सेलिब्रिटींच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टींकडे चाहत्यांचे लक्ष लागले असते. काही सेलिब्रिटी शूटिंगसाठी सेटवर वेळत पोहचत नाहीत. या सेलिब्रिटींच्या यादीत राजेश खन्नाचेदेखील (Rajesh Khanna) नाव आहे. राजेश खन्ना शूटिंगसाठी वेळेत कधीच पोहचत नसत, असे जया प्रदा 'द कपिल शर्मा' या कार्यक्रमात म्हणाल्या.
जया प्रदा आणि राज बब्बर अशा सिनेसृष्टीतील दोन दिग्गजांनी नुकतीच कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात दोघांनीही त्यांच्या फिल्मी करिअरमधल्या अनेक गोष्टींना उजाळा दिला. या कार्यक्रमात कपिल शर्माने दोघांसोबत गप्पा मारल्या. त्यांना अनेक प्रश्न विचारले. दरम्यान कपिलने प्रश्न विचारला, सेटवर कोणते कलाकार उशीरा येतात. तेव्हा जया प्रदा यांनी राजेश खन्नाचे नाव घेतले.
जया प्रदा पुढे म्हणाल्या,"सेटवर राजेश खन्ना खूप उशीरा यायचे. राजेश खन्नांना जर सकाळी सातची वेळ दिली असेल तर ते थेट रात्री आठ वाजता सेटवर यायचे आणि नऊ वाजता पॅकअपदेखील करायचे. त्यामुळे सेटवर उशीरा येणाऱ्यांच्या यादीत जया प्रदा यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते".
राजेश खन्नांनाच्या 'आनंद'चा रिमेक
बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या आनंद या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता लवकरच या सिनेमाच्या रिमेकची निर्मिती केली जाणार आहे. एन सी सिप्पी यांचा नातू म्हणजेच समीर राज सिप्पी आणि विक्रम खाखर हे या सिनेमाची निर्मिती करणार आहे. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा आनंद हा सिनेमा 12 मार्च 1971 रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाचं दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी यांनी केलं होतं. आनंद सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली होती. त्यामुळे प्रेक्षक आता रिमेकची प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या