Happy Birthday Dimple Kapadia : पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले राजेश खन्ना-डिम्पल कपाडिया, वयाच्या अंतराला विसरून बांधली होती लग्नगाठ!
Dimple Kapadia Birthday : बॉलिवूड अभिनेत्री डिम्पल कपाडिया (Dimple Kapadia) आज त्यांचा 65वा वाढदिवस साजरा करत आहेत.
Dimple Kapadia Birthday : बॉलिवूड अभिनेत्री डिम्पल कपाडिया (Dimple Kapadia) आज त्यांचा 65वा वाढदिवस साजरा करत आहेत. 60 ते 70च्या दशका डिम्पल कपाडिया यांनी बॉलिवूड विश्व गाजवले होते. त्यांनी त्यांच्या काळात अनेक हिट चित्रपट दिले होते. या चित्रपटांमधून त्यांना खूप नाव आणि प्रसिद्धी मिळाली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नायिकेची पारंपारिक प्रतिमा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे डिम्पल कपाडिया. डिम्पल कपाडिया यांनी वयाच्या अवघ्या 15-16व्या वर्षी ‘बॉबी’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.
ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडिया यांची जोडी खूप पसंत केली गेली. ‘बॉबी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि डिम्पल कपाडिया यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटामध्ये त्यांनी खूप बोल्ड सीन्स दिले होते. या चित्रपटानंतर डिम्पल यांच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या.
पहिल्याच नजरेत प्रेम जमलं!
राजेश खन्ना एका कार्यक्रमासाठी गुजरातला गेले होते. जिथे डिम्पल कपाडियांसोबत त्यांची पहिली भेट झाली. या कार्यक्रमात राजेश खन्ना प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांचे अफेअर तीन वर्षे चालले आणि त्यानंतर 1973 मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केले. त्यावेळी डिम्पल फक्त 16 वर्षांच्या होत्या आणि राजेश खन्ना त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे होते. पण, हे वयातील अंतर त्यांच्यातील प्रेम कमी करू शकले नाही.
‘या’ कारणामुळे सुरु झाले मतभेद
डिम्पलने लग्नानंतर चित्रपटात काम करणे बंद करावे, असे राजेश खन्ना यांना वाटत होते. त्यामुळे लग्नानंतर त्यांनी डिम्पलसमोर एक अट ठेवली होती की, त्या यापुढे चित्रपटात काम करणार नाही. पण, आपण चित्रपटात काम करतच राहावे, अशी डिम्पल यांची मर्जी होती. त्यानंतर त्यांच्यात मतभेद सुरू झाले. याच वादामुळे डिम्पलने राजेश खन्ना यांचे घर सोडले. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. लग्न केल्यानंतर 10 वर्षांनी दोघेही वेगळे राहू लागले. दोघांमध्ये दुरावा कायम होता, पण दोघांनीही कधी घटस्फोट घेतला नाही. मात्र, त्यांचे नाते पूर्वीसारखे राहिले नाही.
'अर्जुन', 'एतबार', 'काश', 'राम लखन', 'बीस साल बाद', 'बंटबारा', 'प्रहार', 'अजूबा', 'नरसिम्हा', 'गर्दिश', 'क्रांतिवीर', 'दिल चाहता है', 'बीईंग सायरस', 'दबंग', 'कॉकटेल','पटियाला हाउस', 'फायडिंग फॅनी', असा हिट चित्रपटात डिम्पल कपाडिया झळकल्या आहेत. 1973मध्ये ‘बॉबी’, 1985मध्ये ‘सागर’ आणि 1994मध्ये ‘क्रांतिवीर’साठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा :