Jaya Bachchan: 'मी बहिरी नाहीये'; फोटोग्राफर्सवर पुन्हा भडकल्या जया बच्चन, व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) या फोटोग्राफर्सवर भडकलेल्या दिसत आहेत.
![Jaya Bachchan: 'मी बहिरी नाहीये'; फोटोग्राफर्सवर पुन्हा भडकल्या जया बच्चन, व्हिडीओ व्हायरल jaya bachchan lashes out on paparazzi at rocky aur rani kii prem kahaani premiere video viral on social media Jaya Bachchan: 'मी बहिरी नाहीये'; फोटोग्राफर्सवर पुन्हा भडकल्या जया बच्चन, व्हिडीओ व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/26/5e7ed78c74b73cfccdf7c0325a2ab9ca1690347665113259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rocky Aur Rani Kii Prem Kahaani Premiere: अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) 28 जुलै रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू असून रणवीर आणि आलियाचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला. या प्रीमियरला अनेक सेलिब्रिटी आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोक उपस्थित होते. चित्रपटाच्या प्रीमियरच्या रेड कार्पेटवरील एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) या फोटोग्राफर्सवर भडकलेल्या दिसत आहेत.
जया बच्चन यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रीमियरला त्या मुलगा अभिषेक बच्चनसोबत आल्या होत्या. जया बच्चन यांना पाहताच बाहेर उभ्या असलेल्या फोटोग्राफर्सनं फोटोसाठी ओरडायला सुरुवात केली. यामुळे जया बच्चन चिडल्या आणि म्हणाल्या, 'मी बहिरी नाहीये'.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जया बच्चन अभिषेकची वाट बघत आहेत, त्या यादरम्यान उभे असलेले फोटोग्राफर्स जया बच्चन यांना फोटोसाठी पोज देण्याची विनंती करताना दिसत आहेत. यानंतर जया बच्चन यांना राग येतो. त्या म्हणतात, 'मी बहिरी नाही, मला नीट ऐकू येते'. त्यानंतर अभिषेक येतो आणि दोघेही फोटोसाठी पोज न देताच पुढे जातात.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह, अभिनेत्री आलिया भट्ट, जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. कौटुंबिक नाट्य, रोमान्स, डान्स, भावना, संगीत या सर्व गोष्टी या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहेत, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीरची जोडी पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)