ITA Awards 2022 : इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार सोहळ्यात 'The Kashmir Files' 'गोल्डन फिल्म' पुरस्काराने सन्मानित
The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रींचा 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे.
![ITA Awards 2022 : इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार सोहळ्यात 'The Kashmir Files' 'गोल्डन फिल्म' पुरस्काराने सन्मानित ITA Awards 2022 Indian Television Academy Awards The Kashmir Files honored with Golden Film Award Vivek Agnihotri shared post ITA Awards 2022 : इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार सोहळ्यात 'The Kashmir Files' 'गोल्डन फिल्म' पुरस्काराने सन्मानित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/13/4d511e1ebf8411af5a4d569fcc347cfa1670899155596254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
The Kashmir Files Wins ITA Awards 2022 : विवेक अग्निहोत्रींचा (Vivek Agnihotri) 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाला 'इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार' (ITA Awards 2022) सोहळ्यात सन्मानित करण्यात आले आहे.
'द कश्मीर फाइल्स' 'गोल्डन फिल्म' पुरस्काराने सन्मानित (Golden Film Award To The Kashmir Files) :
'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा 2022 मध्ये वादग्रस्त ठरला होता. हा सिनेमा काहींच्या पसंतीस उतरला तर काहींनी या सिनेमावर टीका केली. पण तरीही हा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करत आपला दबदबा कायम ठेवला. आता या सिनेमाला 'इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार' (Indian Television Academy Awards) सोहळ्यात 'गोल्डन फिल्म' (Golden Film) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
View this post on Instagram
विवेक अग्निहोत्रींनी (Vivek Agnihotri) मानले आभार
विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं आहे,"#TheKashmirFiles ला गोल्डन पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल @TheITA_Official यांचे आभार... हा लोकांचा सिनेमा आहे. मी फक्त माध्यम आहे... हा पुरस्कार काश्मीर खोऱ्यातील पंडितांना समर्पित करतो".
विवेक अग्निहोत्री यांनी पुढे लिहिलं आहे,"भारतीय सिनेमाचा गोल्डन फिल्म म्हणून सन्मान होणं ही आनंदाची बाब आहे. #TheKashmirFiles ला मिळालेला हा पुरस्कार अमानुष अत्याचारांचा सामना करावा लागलेल्या काश्मीर खोऱ्यातील पंडितांना समर्पित करण्यात येत आहे."
लवकरच येणार द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' (The Kashmir Files Unreported)
'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) नदाव लॅपिड यांनी या सिनेमाला प्रपोगंडा आणि वल्गर सिनेमा असल्याचं म्हटलं होतं. या सिनेमाला विरोध झाल्यामुळे विवेक अग्निहोत्री यांनी 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' (The Kashmir Files Unreported) या सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमात नेमकं काय असेल हे अद्याप समोर आलेलं नाही.
संबंधित बातम्या
Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'च्या वादादरम्यान विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; ट्वीट करत म्हणाले, आता बनवणार 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)