एक्स्प्लोर
हा लज्जास्पद प्रकार, पॅपोनला अटक केली पाहिजे : रवीना टंडन
पॅपोनने लहान मुलांसोबत होळी सेलिब्रेशनचं फेसबुक लाईव्ह केलं होतं, ज्यामध्ये तो एका मुलीला किस करताना दिसत आहे. यानंतर आता काहींनी त्याचा बचाव केला आहे, तर त्याच्याविरोधात काहींनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक पॅपोन याच्या विरोधात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगात तक्रार दाखल झाली आहे. पॅपोनने लहान मुलांसोबत होळी सेलिब्रेशनचं फेसबुक लाईव्ह केलं होतं, ज्यामध्ये तो एका मुलीला किस करताना दिसत आहे. यानंतर आता काहींनी त्याचा बचाव केला आहे, तर त्याच्याविरोधात काहींनी संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्री रवीना टंडनने तर पॅपोनला अटक करण्याची मागणी केली आहे. ''हा जो प्रकार आहे तो लज्जास्पद आहे. पॅपोनला अटक केली पाहिजे. मुलीच्या पालकांवर दबाव आहे. जे काही स्पष्टीकरण देण्यात आलंय, ते हास्यास्पद आहे,'' असं म्हणत पॅपोनचं समर्थन करणाऱ्यांचाही रवीना टंडनने समाचार घेतला आहे.
दरम्यान, पॅपोनने काहीही चुकीचं केलं नसल्याचं संबंधित मुलीने म्हटलं आहे. ''होळी स्पेशल एपिसोडनंतर सर्वांनी होळीचं सेलिब्रेशन केलं आणि त्याचं फेसबुक लाईव्ह केलं होतं. पॅपोन सरांनी जे केलं, ते आपले आई-वडिलही करतात. त्याचा चुकीचा अर्थ काढू नये,'' असं आवाहन संबंधित मुलीने केलं आहे. पॅपोनचं स्पष्टीकरण ''सध्या माझ्याबाबत जी काही चर्चा सुरु आहे, ते पाहून अत्यंत त्रास होत आहे. जे कुणी मला ओळखतात, त्यांना माहित आहे, की मी अत्यंत सहज आणि फ्री व्यक्ती आहे. माझ्या फेसबुकवरचा व्हिडीओ पुन्हा एकदा पाहा आणि विचार करा की जर काही चुकीचं असतं तर मी स्वतःच तो व्हिडीओ का प्रमोट केला असता? माझी प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे, की यामध्ये जे सहभागी आहे, त्यांच्यावर या सर्व प्रकरणाचा काय परिणाम होईल, याचा जरा विचार करा. माझी बायको आणि दोन लहान मुलं आहेत. यामध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे, जिची ओळख व्हिडीओमधून स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकारामुळे आमचे दोघांचेही कुटुंब उद्ध्वस्त होतील,'' असं स्पष्टीकरण पॅपोनने एका पत्रकाद्वारे दिलं आहे. काहीही चुकी नसताना मला गुन्हेगारासारखं ग्रहीत धरलं जात आहे. मात्र या कठीण वेळेतही माझं कुटुंब माझ्या मागे उभं आहे, असंही पुढे त्याने म्हटलं आहे. काय आहे प्रकरण? पॅपोनने लहान मुलांसोबत होळी सेलिब्रेशनचं फेसबुक लाईव्ह केलं होतं, ज्यामध्ये तो एका मुलीला किस करताना दिसत आहे. मुलांसोबत सेलिब्रेशन करता करता पॅपोन एका मुलीला किस करताना व्हिडीओच्या शेवटी दिसत आहे. त्यानंतर पॅपोन फेसबुक लाईव्ह बंद करण्याचा आदेश देतो. &TV वरील या शोमध्ये पॅपोनसोबत हिमेश रेशमिया आणि शानही जजच्या भूमिकेत आहेत. &TV चं स्पष्टीकरण शोमधील सर्व स्पर्धकांची काळजी घेणं आणि सर्व नियमांचं पालन करणं ही चॅनलची जबाबदारी आहे आणि ती घेतली जाते, असं स्पष्टीकरण &TV ने दिलं आहे. मुलीच्या वडिलांचं स्पष्टीकरण पॅपोन ही माझ्या मुलीसाठी वडिलधारी व्यक्ती आहे. यावर आमचा काहीही आक्षेप नाही. हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आला आहे. माध्यमांनी हा व्हिडीओ दाखवू नये, अशी विनंती संबंधित मुलीच्या वडिलांनी केली आहे.Disgusting! Shameful!Perverse! This man Papon should be arrested ! The girls parents succumbing to pressure ! The explanations given are ridiculous! Haven’t felt such anger and shame to see this happen and some on tv debates actually defending the act !
— Raveena Tandon (@TandonRaveena) February 23, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement