(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ira khan: पतीला कपड्यांमुळे ट्रोल करणाऱ्यांना आयरानं दिलं उत्तर; आमिरची लेक म्हणाली, "तुम्ही त्याला खूप ट्रोल केले,आता तो..."
Ira khan: नुपूर आणि आयराच्या रजिस्टर मॅरेजचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यामध्ये दिसले की, नुपूर हा शॉर्ट आणि टी-शर्ट अशा लूकमध्ये वेडिंग वेन्यूपर्यंत धावत आला. त्याच्या या लूकला अनेकांनी ट्रोल केलं.
Ira Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरे यांचा लग्न सोहळा उदयपूरमध्ये पार पडला. लग्नसोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ आयरा शेअर करत आहे. नुपूर आणि आयरा यांनी जोडप्याने प्रथम मुंबईत रजिस्टर मॅरेज केले. नुपूर आणि आयराच्या रजिस्टर मॅरेजचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यामध्ये दिसले की, नुपूर हा शॉर्ट आणि टी-शर्ट अशा लूकमध्ये वेडिंग वेन्यूपर्यंत धावत आला. त्याच्या या लूकला अनेकांनी ट्रोल केलं. अशताच आता आयरानं एक पोस्ट शेअर करुन ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.
आयरानं शेअर केली पोस्ट
आयरानं नुपूरचा एक फोटो शेअर करुन ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. आयरानं शेअर केलेल्या फोटोमध्ये नुपूर हा पूलच्या बाजूला बसलेला आहे. या फोटोला आयरानं कॅप्शन दिलं,"तुम्ही त्याला खूप ट्रोल केले. आता तो पूलजवळ देखील लेदर जॅकेट आणि जीन्स घातले आहे." आयराच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारी रोजी मुंबईत रजिस्टर मॅरेज केले. उदयपूरमध्ये आयरा आणि नुपूर यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलं. या जोडप्याचे रिसेप्शन नंतर मुंबईत आयोजित करण्यात आले होते.
View this post on Instagram
आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शनला 'या' कलाकारांनी लावली हजेरी
शाहरुख खान, सलमान खान, सोनाली बेंद्रे, हेमा मालिनी, रेखा, अनिल कपूर, धर्मेंद्र या कलाकारांनी आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि मुकेश अंबानी यांनी देखील आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली.
आयराचा होणारा पती नुपुर शिखरेचा जन्म 17 ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला आहे. नुपुर हा एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. नुपूर आणि आयरा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अशताच त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट केली. त्यानंतर आयरा आणि नुपूर यांनी उदयपूरमध्ये ख्रिचन पद्धतीनं लग्न केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Ira Khan: आमिरच्या लेकीच्या 'त्या' फोटोमुळे नव्या वादाला तोंड फुटलं; नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं!