एक्स्प्लोर

Ira Khan : जमलं रे जमलं! आमिर खानची लेक आयरा झाली ‘एंगेज’; बॉयफ्रेंड नुपूर शिखरेने हटके अंदाजात घातली लग्नाची मागणी

Ira Khan : आमिर खानची लेक आयरा मागील बऱ्याच काळापासून नुपूर शिखरेला डेट करत आहे, दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान नुपूर शिखरने आयराला लग्नासाठी प्रपोज केले आहे.

Ira Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याची मुलगी आयरा खान (Ira Khan) सध्या चर्चेचा भाग बनली आहे. आयरा मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्या सोबतच्या नात्यामुळे ती नेहमी लाईमलाईटमध्ये असते. अनेकदा ती बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबत (Nupur Shikhare) सुंदर फोटो शेअर करताना दिसते. आयरा फिल्मी दुनियेत फारशी सक्रिय नाही. पण, तरीही चाहत्यांमध्ये तिची क्रेझ आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अनेकदा तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगत असते. नुकताच तिने एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे तिला अतिशय रोमँटिक अंदाजात प्रपोज करताना दिसत आहे.

आमिर खानची लेक आयरा मागील बऱ्याच काळापासून नुपूर शिखरेला डेट करत आहे, दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान नुपूर शिखरने आयराला लग्नासाठी प्रपोज केले आहे. त्यानंतर आयराच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram
 
A post shared by Ira Khan (@khan.ira)

आयरा खानने देखील नुपूर शिखरेचा हा रोमँटिक लग्न प्रस्ताव स्वीकारला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नुपूर एका कार्यक्रमात परफॉर्म करत आहे आणि आयरा त्याला पाहण्यासाठी तिथे येते, हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी खास सरप्राईज देत कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी नुपूरने आयराला प्रपोज केले. गुडघ्यावर बसून त्याने आयरासमोर अंगठी धरली आणि लग्नाची मागणी घातली. तर, त्यानंतर आयराने देखील नुपूरला किस करत, हो असे उत्तर देऊन चाहत्यांना सरप्राईज दिले.

डेटिंगपासून चर्चेत जोडी!

आयरा आणि नुपूर दोघेही 2020पासून एकमेकांना डेट करत आहेत. नुपूर हा पेशाने फिटनेस ट्रेनर आहे. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दोघेही त्यांच्या क्यूट आणि रोमँटिक फोटो-व्हिडींओंद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. नुकताच आयरा खानने सोशल मीडियावर हा रोमँटिक प्रपोजचा व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून चाहते देखील आनंदले आहेत.

आयरा खान ही अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. 1997 मध्ये आयराचा जन्म झाला होता. आयरा ही सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे आणि सोशल मीडियावर तिचे खूप मोठे चाहते आहेत. अभिनेता असणाऱ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याऐवजी, आयराने दिग्दर्शक म्हणून कॅमेऱ्याच्या मागे स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. तिने 2019मध्ये थिएटर प्रोडक्शन हाऊस 'युरिपाइड्स' मीडियाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.

हेही वाचा :

आमिरच्या लेकीनं पाहिला गंगूबाई काठियावाडी चित्रपट, म्हणाली....

Ira Khan : नैराश्यानंतर आमिर खानची लेक 'या' गंभीर आजाराशी देतेय झुंज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget