Amruta Fadnavis: 'पर्यावरणावर प्रेम करा...'; पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी शेअर केली खास पोस्ट
आज (5 जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) अमृता फडणवीस यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
Amruta Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. अमृता फडणवीस या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. विविध विषयांवर आधारित पोस्ट त्या सोशल मीडियावर शेअर करतात. आज (5 जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) अमृता फडणवीस यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अमृता फडणवीस यांची पोस्ट
अमृता फडणवीस यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'काही लोक मानवनिर्मित जगात हरवून जातात तर काही निसर्गाच्या जंगलात स्वतःला शोधण्यासाठी भटकतात! पर्यावरणावर प्रेम करा, स्वतःला शोधण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी पर्यावरणााचे संरक्षण करा!'. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी शेअर केलेल्या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात. बस बाई बस, किचन कलाकार या कार्यक्रमामध्ये अमृता फडणीस यांनी हजेरी लावली होती.
अमृता फडणवीस यांची गाणी
अमृता फडणवीस यांचं 'मूड बना लिया' हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. या गाण्याला Meet Bros यांनी संगीत दिलं आहे. तर कुमार हे या गाण्याचे गीतकार आहेत. अमृता फडणवीस यांच्या या नव्या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्यांच्या 'वो तेरे प्यार का गम' या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोतम ही गाणी अमृता यांनी गायली आहेत. अमृता फडणवीस या सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. त्यांना इन्स्टग्रामवर 696K फॉलोवर्स आहेत. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांचं 'मूड बना लिया' गाणं होतंय ट्रेंड; मिळाले एवढे व्ह्यूज आणि लाइक्स