एक्स्प्लोर

Pathaan Box Office Collection Day 1: 'पठाण'ची बॉक्स ऑफिसवर हवा! पहिल्या दिवशी कमावले एवढे कोटी

अनेकांनी पठाण (Pathaan) चित्रपट पाहण्यासाठी अॅडव्हान्स बुकिंग केलं होतं. तर शाहरुखच्या (Shah Rukh Khan) काही चाहत्यांनी पठाण चित्रपट बघण्यासाठी अख्खं थिएटर बुक केलं होतं.

Pathaan Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट काल (25 जानेवारी) प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. अनेकांनी पठाण चित्रपट पाहण्यासाठी अॅडव्हान्स बुकिंग केलं होतं. तर शाहरुखच्या काही चाहत्यांनी पठाण चित्रपट बघण्यासाठी अख्खं थिएटर बुक केलं होतं. आता या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर किती कमाई केली? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात पठाणची पहिल्या दिवसाची कमाई-

पठाणचं कलेक्शन 

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार, पठाण चित्रपटानं नॅशनल चेन्स थिएटरमध्ये 25 जानेवारी रोजी संध्याकाळी 8.15 वाजेपर्यंत 25 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. शाहरुख खानच्या 'पठाण'ने PVR मध्ये 11.40 कोटी, INOX मध्ये 8.75 कोटी, Cinepolis मध्ये 4.90 कोटींची कमाई केली. 

या चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक केला

या चित्रपटानं  'वॉर', 'ठग्स ऑफ हिंदोस्तान आणि 'केजीएफ' यांसारख्या चित्रपटांचे ओपनिंग डे कलेक्शन रेकॉर्ड तोडले आहे. 'वॉर' चित्रपटानं पहिल्या दिवशी 19.67 कोटी, 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ने 18 कोटी आणि 'केजीएफ'ने 22.15 कोटी रुपये कमावले होते. 

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शनं सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, काल (25 जानेवारी) दिवसभरात पठाणच्या हिंदी व्हर्जननं 55 कोटींची कमाई केली.

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

पठाण चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली. शाहरुखनं या चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे.

शाहरुखचे आगामी चित्रपट

पठाणनंतर शाहरुख हा जवान आणि डंकी या आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या वर्षी राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान यांनी एका व्हिडीओच्या माध्यामातून डंकी या चित्रपटाची घोषणा केली होती तर शाहरुखनं जवान चित्रपटातील त्याचा लूक देखील रिलीज केला होता. जवान ही एक अॅक्शन फिल्म असणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन एटली करणार आहे. या चित्रपटात विजय सेतुपती देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. जवान हा चित्रपट  2 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Pathaan Review : शाहरुख खानचा 'पठाण' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget