(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IFFI 2022 : 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात; जाणून घ्या आज काय खास...
International Film Festival : आजपासून 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे.
International Film Festival 2022 : 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (International Film Festival 2022) आजपासून सुरुवात होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. तसेच गोव्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्रीदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. गोव्यातील प्रमुख चौकात तसेच राजधानी पणजी येथे भव्य सजावट करण्यात आली आहे.
20 नोव्हेंबरला खास काय?
- आज 20 नोव्हेंबर रोजी शाम मुखर्जी स्टेडियमवर अभिनेता अजय देवगण,अभिनेता सुनील शेट्टी,अभिनेता प्रभू देवा यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे.
- भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या बहुचर्चित 'दृश्यम 2' सिनेमाचं खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे.
- 'दृश्यम 2'सह एसएस राजामौलींचा 'आरआरआर' आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 'अभिमान' हा सिनेमादेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
- महोत्सावाच्या पहिल्या दिवशी अद्वैत चौहान, गुलशन ग्रोव्हर, पियुष गुप्ता, व्ही. विजयेंद्र आणि पंकज त्रिपाठी यांच्या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
सेलिब्रिटींचा मेळा
दिग्दर्शक डायटर बर्नर यांच्या 'अल्मा आणि ऑस्कर' या सिनेमाने यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात होणार आहे. तर क्रिसझटॉप झानुसी यांच्या 'परफेक्ट नंबर' या सिनेमाने महोत्सवाची सांगता होणार आहे. देश-विदेशातील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेप्रेमी महोत्सवाला हजेरी लावणार आहेत.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाच मराठी सिनेमे
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाच मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे. यात विक्रम पटवर्धन यांचा 'फ्रेम', दिग्पाल लांजेरकचा 'शेर शिवराज', डॉ. सलील कुलकर्णी यांचा 'एकदा काय झालं', प्रवीण तरडे यांचा 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' आणि शेखर रणखांबे यांच्या 'रेखा' या सिनेमांचा समावेश आहे. 'थ्री ऑफ अस', 'द स्टोरी टेलर', 'मेजर', 'सिया', 'द कश्मीर फाइल्स' हे हिंदी सिनेमे दाखवले जाणार आहेत. तसेच एस.एस राजामौलींचा 'आरआरआर' हे तेलुगू वर्जनमधील सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
25 feature films and 20 non-feature films to be screened during the 53rd International Film Festival of India (IFFI) from 20th-28th November in Goa.
— ANI (@ANI) October 22, 2022
The opening non-feature film of Indian Panorama, 2022 is ‘The Show Must Go On’ (English) directed by Divya Cowasji. pic.twitter.com/vTMspCqIkB
सिनेमाप्रेमींना मनोरंजनाची मेजवानी!
मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांचं खास स्क्रिनिंग असणार आहे. सिनेमाप्रेमींना आठवडाभर मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. जवळपास आठ दिवस हा महोत्सव सुरू असणार आहे. अनेक दिग्गज कलाकार मंडळींच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडणार आहे. त्यामुळे यंदा कोणते कलाकार चित्रपट महोत्सवाला उपस्थित राहणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. व्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे.
संबंधित बातम्या