एक्स्प्लोर
मनसेच्या 5 कोटींच्या मागणीला माझा विरोधच होता : मुख्यमंत्री
मुंबई : 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपट प्रदर्शनाच्या मोबदल्यात 5 कोटींची मदत सैनिक कल्याण निधीला देण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात मी होतो, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी 'ऐ दिल है मुश्किल'च्या वादावर हे स्पष्टीकरण दिलं आहे.
'सत्तेच्या दरबारात मांडवली', मनसेच्या भूमिकेवर सामनातून विखारी टीका
मदत ही स्वयंस्फूर्तीने दिली पाहिजे, असंच माझं मत होतं. त्याबद्दलचं माझं मत मी राज ठाकरे यांच्यासमोरच व्यक्त केलं होतं. पण फिल्म निर्मात्यांनी मात्र 5 कोटींची मदत देण्यास उत्सुक असल्याचं सांगितल्यानेच अखेर हा तोडगा काढला. शिवाय या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी फिल्म निर्मात्यांनी मला विनंती केल्यानेच या वादात मध्यस्थी केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.ऐ दिल.. वादः मनसेने तोडपाणी केल्याची शंका : अजित पवार
दिग्दर्शक करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटात ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरसह पाकिस्तानी कलाकार फवाद खानने भूमिका साकारली आहे. एकीकडे सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरु असताना, पाक कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम करु न देण्याची भूमिका घेत, मनसेने 'ऐ दिल है मुश्किल'च्या प्रदर्शनाला विरोध केला होता.फडणवीसांनी 5 कोटींना देशभक्ती विकत घेतली : शबाना आझमी
पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या वादावर तोडगा काढण्यात आला होता. पण मुख्यमंत्र्यांनी 'मांडवली' केली, अशी टीका शिवसेनेसह मनसेने केली होती. इतकंच नाही तर अभिनेत्री शबाना आझमी यांनीही मुख्यमंत्र्यांनी 5 कोटी रुपयांत देशभक्ती विकत घेतली, अशी सडकून टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. संबंधित बातम्या''ऐ दिल.. वादः मुख्यमंत्री, राज ठाकरेंच्या बैठकीची माहिती सार्वजनिक करा''
सैन्याला स्वत:चा स्वाभिमान, खंडणीचा पैसा नको, उद्धव यांचा राज ठाकरेंना टोला
पाकिस्तानी कलाकारांवरची बंदी योग्यच : मुख्यमंत्री
...म्हणून 'ऐ दिल है मुश्किल'ला परवानगी : राज ठाकरे
'पाकिस्तानी कलाकारांसोबत काम केल्यास अभिमान वाटेल'
'ऐ दिल..'बाबत रणनीतीसाठी मनसेची कृष्णकुंजवर खलबतं
मनसेच्या आंदोलनांवर अभिनेत्री रेणुका शहाणेंची फेसबुक पोस्ट
'ऐ दिल..'च्या प्रदर्शनासाठी करण जोहर राजनाथ यांच्या दारी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement