(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kishori Pednekar taunts Kareena Kapoor : बॉलिवूडमधील जबाबदार व्यक्तींनी जबाबदारीने वागले पाहिजे
Kareena Kapoor Covid Positive : अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. या अभिनेत्रींनी अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे या अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. यावर मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अभिनेत्रींना सुनावले. 'दोन लहान मुलं, तरी इतकं बिनधास्त कसे?',असा सवाल किशोरी पेडणेकरांनी उपस्थित केला आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या,"बॉलिवूडकरांनी नियम पाळायला हवेत. तसेच राजकिय लोकांनीदेखील नियमांचे पालन करायला हवे. ग्रॅन्ड हयातमधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये नियम मोडले जात आहेत. बॉलिवूड आणि राजकिय क्षेत्रातील लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. करीना कपूर आणि अमृता अरोरा सध्या होम क्वारंटाईन आहेत. दोघींवर पालिकेचं लक्ष आहे. करिना कपूरला दोन लहान मुलं आहेत, तरी इतकं बिनधास्त".
महापौर पुढे म्हणाल्या,"ज्यांनी विचारलं कोरोना कुठे आहे त्यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूडमधील जबाबदार व्यक्तींनी जबाबदारीने वागले पाहिजे. माझं प्रामाणिक मत आहे की,आपले मुख्यमंत्री काटेकोर नियमांचं पालन करत आहेत तर राजकिय व्यक्तींनीदेखील नियम पाळले पाहिजेत." हॉटेलधारकांनादेखील महापौरांनी ईशारा दिला आहे. नियम पाळले जाणं ही हॉटेलधारकांचीही जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या.