(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hetal Dave Biopic : देशातील एकमेव महिला Sumo Wrestler च्या आयुष्यावर येणार वेब-सीरिज; 'सूमो दीदी'च्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री
Hetal Dave : हेतल दवे या देशातील एकमेव महिला सुमो रेसलरच्या आयुष्यावर आता वेब-सीरिज येणार आहे.
Hetal Dave Biopic : बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा (Biopic) ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे जगभरातील वेगवेगळ्या व्यक्तींची आयुष्य प्रेक्षकांना आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळत आहेत. सत्य घटनांवर आधारित सिनेमा बनवण्यावर निर्मात्यांचा भर आहे. आता देशातील एकमेव महिला सुमो रेसलर (Sumo Wrestler) हेतल दवे (Hetal Dave) यांच्या आयुष्यावर वेब-सीरिज (Web Series) येणार आहे.
'सूमो दीदी' येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
हेतल दवे या देशातील पहिल्या आणि एकमेव व्यावसायिक महिला सुमो रेसलर आहेत. 2008 साली त्यांच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Limca Book Of Records) करण्यात आली आहे. तसेच पोलंडमध्ये झालेल्या एका स्पर्धेत त्यांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. हेतल दवे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सीरिजचं नाव 'सूमो दीदी' असल्याचं म्हटलं जात आहे.
'सूमो दीदी' या सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री श्रीयम भगनानी (Shriyam Bhagnani) हेतल दवे यांचं पात्र साकारणार आहे. या सीरिजसाठी श्रीयम खूप मेहनत घेत आहे. या भूमिकेसाठी तिने खूप वजन वाढवले आहे. तसेच ती साहिल रशीदकडून खास प्रशिक्षण घेत आहे. श्रीयम याआधी 'सिटी ऑफ ड्रीम्स' आणि 'बागी 2'मध्ये दिसून आली होती.
View this post on Instagram
'सूमो दीदी' या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा जयंत रोहतगी सांभाळणार आहे. श्रीयमसह या सीरिजमध्ये नीतेश पांडे, चैतन्य शर्मा आणि राघव धीर दिसणार आहेत. या वेबसीरिजची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या वेबसीरिजची वाट पाहत आहेत. आता या वेबसीरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली असून लवकरच ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या