Abhishek Bachchan : अभिषेकने घटस्फोटाची 'ती' पोस्ट लाईक का केली? समोर आलं मोठं कारण
Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनने घटस्फोटाची ती पोस्ट का लाईक केली याचं एक मोठं कारण सध्या समोर आलं आहे.
Abhishek Bachchan : मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना वारंवार एका गोष्टीमुळे दुजोरा मिळत आहे. त्यातच अलिकडेच अभिषेकने घटस्फोटासंदर्भातली एक पोस्ट लाईक केली होती. पण त्याने ती पोस्ट का लाईक केली होती, याचं एक मोठं कारण सध्या समोर आलं आहे.
सोशल मीडियावर हिना खंडेलवाल यांनी 'ग्रे घटस्फोट' किंवा 'सिल्व्हर स्प्लिटर्स'चे प्रमाण जगभरात वाढत आहे, या संदर्भात एक पोस्ट केली होती. ही पोस्ट अभिषेकनेही लाईक केली होती. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं. पण आता यामागचं कारण पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
अभिषेकने पोस्ट लाईक करण्यामागचं खरं कारण काय?
अभिषेकने ही पोस्ट का लाईक केली होती, याचं कारण आल्यामुळे चाहत्यांच्याही प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या घटस्फोट घेत आहेत, म्हणून अभिषेकने ती पोस्ट लाईक केली नव्हती. तर या पोस्टसाठी ऐश्वर्याचा जुना मित्र जिकर मार्करचंही योगदान आहे. या पोस्टमध्ये तसा उल्लेखही करण्यात आला आहे. त्याच्यासाठी अभिषेकने ही पोस्ट लाईक केली होती.
जिकर मार्कर आणि ऐश्वर्याची मैत्री
जिकर आणि ऐश्वर्या हे दोघेही खूप जुने मित्र आहेत. तसेच तो एक मानसोपचार तज्ज्ञ देखील आहे. त्याने आणि ऐश्वर्याने जीना इसी का नाम हैं, यामध्ये ऐश्वर्यासोबत स्क्रिन देखील शेअर केली होती. ऐश्वर्याच्या जवळच्या मित्राने या पोस्टसाठी पुढाकार घेतल्याने अभिषेकने ही पोस्ट लाईक केल्याचं कारण सध्या समोर आलं आहे.
अभिषेकने पोस्टला केलं लाईक, चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण
अनेकांसह अभिषेक बच्चननेही ही पोस्ट लाईक केली. मात्र, त्याच्या या लाईकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा स्क्रीनशॉटही 'रेडडिट'वर व्हायरल होत आहे. मात्र सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये याबाबत मतभिन्नता दिसून आली. काहींनी अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये सगळं काही ठीकठाक नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर काहींनी त्याची बाजू घेतली. त्याला पोस्टमधील कंटेट आवडला असेल म्हणून त्याने पोस्ट लाईक केली असेही काहींनी म्हटले.