Hashtag Tadev Lagnam : सुबोध भावे अन् तेजश्री प्रधानची जोडी धमाल करण्यास सज्ज, हॅशटॅग तदेव लग्नम 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Hashtag Tadev Lagnam Release Date : 'हॅशटॅग तदेव लग्नम' चित्रपटाचं मोशल पोस्टर रिलीज झालं असून, हा चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई : 'हॅशटॅग तदेव लग्नम' (Hashtag Tadev Lagnam) हे नाव ऐकूनच जरा विचारात पडला असाल ना? हॅशटॅग हा आजचा ट्रेंडिंगमधला शब्द आहे, तर तदेव लग्नम हा संस्कृत शब्द त्यामुळे या दोघांचा परस्परांशी काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना सतावत असतील. हीच उत्सुकता कायम ठेवत, हा भन्नाट विषय घेऊन तरुणाईला आणि त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी 'हॅशटॅग तदेव लग्नम' चित्रपट तुमच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच 'हॅशटॅग तदेव लग्नम' या चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर समोर आलं आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
'हॅशटॅग तदेव लग्नम' चित्रपटाचं मोशल पोस्टर रिलीज
'हॅशटॅग तदेव लग्नम' चित्रपटामध्ये सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची प्रमुख भूमिका असून या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केलं आहे. शेखर विठ्ठल मते निर्मित आणि शुभम फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचं मोशन पोस्टर पाहून यात लग्नातील धमाल पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान हे प्रथमच एकत्र येत आहेत. त्यामुळे या चित्रपटात काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. पण, आता हे 'हॅशटॅग तदेव लग्नम' नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना 4 ऑक्टोबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
हॅशटॅग तदेव लग्नम 'या' दिवशी होणार प्रदर्शित
'एका परिपक्व नातेसंबंधावरील ही गोड कथा आहे. आपल्यापैकी अनेकांना ही कथा स्वतःच्या आयुष्याशी मिळतीजुळती वाटेल. चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, तांत्रिक बाबी या सगळ्याच जमेच्या बाजू आहेत. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे', असं चित्रपटाबच्या निर्मात्यांनी सांगितलं आहे.
पाहा चित्रपटाचं मोशन पोस्टर (Actor Subodh Bhavi Instagram Post)
View this post on Instagram
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आनंद गोखले म्हणतात, ''तदेव लग्नम' या शब्दाचा अर्थ तेच हे एकत्र येणे. आता या चित्रपटासाठी याच नावाची निवड का केली, हे जाणून घेण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता एवढेच सांगेन की, हा एक धमाल चित्रपट आहे.' सुबोध भावे अन् तेजश्री प्रधानची जोडी धमाल करण्यास सज्ज झाली असून प्रेक्षकांना यांना पाहण्याची आतुरता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :