एक्स्प्लोर

Happy Birthday Swapnil Joshi : कधी साकारला कृष्ण, तर कधी शिरीनचा 'बच्चू', वाचा मराठी मनोरंजन विश्वाचा 'चॉकलेट बॉय' स्वप्नील जोशीबद्दल...

Swapnil Joshi : मराठी मनोरंजनसृष्टीतील 'चॉकलेट बॉय' स्वप्नील जोशीचा आज वाढदिवस आहे.

Swapnil Joshi Birthday : मराठी मनोरंजनसृष्टीतील 'चॉकलेट बॉय' स्वप्नील जोशीने (Swapnil Joshi) बालपणीच मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालण्यासोबत त्याने मराठी-हिंदी मालिका, सिनेमे आणि वेबसीरिज अशा सर्वच माध्यमांत काम केलं आहे. विनोदी अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेल्या 'चॉकलेट बॉय' स्वप्नील जोशीचा आज वाढदिवस आहे. 

रामानंद सागर यांच्या सुपरहिट ठरलेल्या 'श्री कृष्णा' या मालिकेत स्वप्नीलने साकारलेली कृष्णाची भूमिका प्रचंड गाजली. या मालिकेमुळे स्वप्नील घराघरांत पोहोचला. त्यानंतर त्याने वयाच्या नवव्या वर्षी 'रामायण' या मालिकेत काम केलं. 'रामायण' मालिकेत स्वप्नील रामचा मुलगा कुशच्या भूमिकेत दिसून आला होता. 

स्वप्नीलला कलेची आवड कशी निर्माण झाली?

स्वप्नीलचं बालपण चाळीत गेलं आहे. लहानपणी चाळीत होत असलेल्या गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये स्वप्नील सहभागी व्हायचा. तसेच शाळेतील नाटकांतदेखील तो भाग घेत असे. बालपणी आसपास सांस्कृतिक वातावरण असल्याने स्वप्नीलला कलेची आवड निर्माण झाली.  

स्वप्नील जोशी हा मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. स्वप्नीचे 'दुनियादारी', 'मुंबई-पुणे-मुंबई', पक पक पकाक, व्हेंटिलेटर, शाळा असे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. तर 'श्रीकृष्ण', 'रामायण', 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' अशा लोकप्रिय मालिकांमध्ये स्वप्नीलने काम केलं आहे. सध्या 'तू तेव्हा तशी' या मालिकेच्या माध्यमातून स्वप्नील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

स्वप्नीने जोशीची दोन लग्न झाली आहेत. त्याचं पहिलं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. अकरावीत असताना तो वर्गातल्या अपर्णा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. त्यानंतर त्यांनी लग्नही केलं. पण त्याचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या चार वर्षांनंतर 2009 साली स्वप्नील आणि अपर्णा विभक्त झाले. त्यानंतर 2011 साली स्वप्नीलने औरंगाबादच्या लीनासोबत दुसरं लग्न केलं. स्वप्नीलला मायरा आणि राघव अशी दोन मुलं आहेत. 

स्वप्नीने जोशीची सध्या मालिका सुरू असली तरी त्याचे अनेक सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत. सचिन पिळगावकर हे स्वप्नील जोशीचे आदर्श आहेत. चॉकलेट बॉय लवकरच 'सिटी ऑफ ड्रीम्स' या बहुचर्चित वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात स्वप्नील गृहमंत्र्याच्या भूमिकेत दिसून शकतो. 

संबंधित बातम्या

Smita Patil : वृत्तनिवेदिका ते सशक्त अभिनेत्री... सौंदर्याची परिभाषा बदलणाऱ्या स्मिता नावाच्या वादळाची गोष्ट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget