Happy Birthday Sidharth Malhotra : 'स्टुडन्ट ऑफ द इयर' ते शेरशाह; पहिलाच सिनेमा सुपरहिट! जाणून घ्या सिद्धार्थ मल्होत्राचा फिल्मी प्रवास...
Sidharth Malhotra : सिने-अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा आज वाढदिवस आहे.
![Happy Birthday Sidharth Malhotra : 'स्टुडन्ट ऑफ द इयर' ते शेरशाह; पहिलाच सिनेमा सुपरहिट! जाणून घ्या सिद्धार्थ मल्होत्राचा फिल्मी प्रवास... Happy Birthday Sidharth Malhotra Student of the Year to SherShah The first movie is a super hit Know Sidharth Malhotra film journey Happy Birthday Sidharth Malhotra : 'स्टुडन्ट ऑफ द इयर' ते शेरशाह; पहिलाच सिनेमा सुपरहिट! जाणून घ्या सिद्धार्थ मल्होत्राचा फिल्मी प्रवास...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/9ec1fc8da717c79346c907886f32962a1673783846700254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sidharth Malhotra : सिने-अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा (Sidharth Malhotra) आज वाढदिवस आहे. सिद्धार्थने 2012 साली प्रदर्शित झालेल्या 'स्टुडन्ट ऑफ द इयर' (Student Of The Year) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पहिल्याच सिनेमासाठी त्याला सिनेसृष्टीतील मानाच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.
करण जौहरच्या (Karan Johar) 'स्टुडन्ट ऑफ द इयर' (Student Of The Year) या सिनेमाच्या माध्यमातून सिद्धार्थच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर त्याने 'हसी तो फसी' या सिनेमात काम केलं. या सिनेमात तो परिणिती चोप्रा आणि अदाह शर्मासोबत झळकला होता.
सिद्धार्थने त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आहे. 2010 साली त्याने करण जौहरच्या 'माय नेम इज खान' या सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. त्याने हसी तो फसी, एक व्हिलन, कपूर अॅन्ड सन्स, इत्तेफाक, मरजावां, शेरशाह अशा अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे.
View this post on Instagram
सिद्धार्थने करण मल्होत्रा दिग्दर्शित आणि अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत ब्रदर्स नावाच्या सिनेमात काम केले. हा सिनेमा 2011 मधील अमेरिकन चित्रपट वॉरियरचा रिमेक होता जो 2015 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमातील सिद्धार्थची अक्षय कुमार सोबत चांगलीच केमिस्ट्री जुळली होती आणि प्रेक्षकांनी ती पसंतही केली होती.
सिद्धार्थ आज एक यशस्वी अभिनेता असला तरी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. यासंदर्भात बोलताना सिद्धार्थ एका मुलाखतीत म्हणाला होता,"आपल्यावर नकारात्मक टीका होत असताना स्वत:वर अधिक मेहनत घ्यायला वेळ मिळतो. कोणत्याही कलाकाराला त्याच्या करिअरच्या काळात कमी अधिक प्रमाणात त्रास सहन करावाच लागतो. यातूनच यातूनच आपण पुढे जात असतो".
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)