![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
लग्नानंतर पतीसोबत ड्राईव्हसाठी निघाली सना खान; रोमॅन्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
धर्मासाठी बॉलिवूडला रामराम ठोकणाऱ्या सना खानच्या लग्नाचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता सना आणि तिच्या पतीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
![लग्नानंतर पतीसोबत ड्राईव्हसाठी निघाली सना खान; रोमॅन्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल Sana khan went for drive with husband anas sayied after marriage video viral on Social Media लग्नानंतर पतीसोबत ड्राईव्हसाठी निघाली सना खान; रोमॅन्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/29180948/Sana-Khan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अभिनेत्री सना खान (Sana Khan) सध्या सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ यांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सना खानने गुजरातचे मौलाना मुफ्ती अनस सैयद (Anas Sayied) यांच्याशी लग्न केलं आहे. दरम्यान महिन्याभरापूर्वी तिने धर्मासाठी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने लग्नानंतरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. आता सना आपल्या पतीसोबत वेळ घालवत आहे. अशातच सना खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती आपल्या पतीसोबत लॉन्ग ड्राइव्हवर निघाली आहे. सना खानने या दरम्यान पीच कलरचा सूट घातला आहे. त्याचसोबत सना खानने आपला चेहराही झाकला आहे.
सना खानने चेहरा झाकल्यामुळे केवळ तिचे डोळे दिसत आहेत. तसेच सना खानचे पती अनस सैयद गाडी चालवताना दिसत आहेत. सना खानच्या या व्हिडीओवर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत. सनाने काही दिवसांपूर्वीच आपल्या लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती दोन्ही हातांवर मेहंदी काढताना दिसून आली होती.
View this post on Instagram
दरम्यान, सना खान आणि अनस सैयद यांनी 20 नोव्हेंबर रोजी आपली लग्नगाठ बांधली होती. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत लिहिलं होतं की, "अल्लाहसाठी एकमेकांवर प्रेम केलं, अल्लाहसाटी एकमेकांशी लग्न केलं. अल्लाह आम्हाला या जगात आणि स्वर्गात एकत्र ठेवेल.' मीडिया रिपोर्टनुसार, सनाचे पती धर्मगुरु आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे अनेक चाहते हैराण झाले होते. दरम्यान, सना खानने चित्रपट सृष्टीला रामराम ठोकला आहे. यासंदर्भातील घोषणा अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट शेअर करत केली होती.
View this post on Instagram
सना खानने २० नोव्हेंबरला रात्री सूरतमधील मुफ्ती अनसशी लग्न केलं. लग्नावेळी तिने संपूर्ण पांढऱ्या रंगाचा पोशाख घातला होता. त्यावर पांढऱ्या रंगाचाच हिजाबही होता. लग्न झाल्यानंतर वधू- वरांनी केकही कापला. केक कापतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ऑक्टोबर महिन्यात सनाने धर्मासाठी बॉलिवूड कायमचं सोडण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना तिने लिहिले की, 'मी मानवतेच्या आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचं ठरवलं आहे.'
दरम्यान, सना खानने 'जय हो', 'टॉयलेट एक प्रेम कथा', 'धन धना धन गोल' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मॉडेलिंगसह तिने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं आहे. यासोबतच 'बिग बॉस', 'झलक दिखला जा' आणि 'फिअर फॅक्टर' यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)