एक्स्प्लोर

Happy Birthday Mugdha Godse : मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म, पेट्रोल पंपवरही केलं काम! आता बॉलिवूड विश्व गाजवतेय मुग्धा गोडसे!

Mugdha Godse Birthday : 'फॅशन' चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री मुग्धा गोडसे (Mugdha Godse) आज (26 जुलै) तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे.

Mugdha Godse Birthday : 'फॅशन' चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री मुग्धा गोडसे (Mugdha Godse) आज (26 जुलै) तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे. मुग्धाचा जन्म 1986 मध्ये पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मराठी माध्यमात शिकलेली मुग्धा आपल्या मेहनतीच्या जोरावर आज मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री बनली आहे. सुरुवातीपासूनच तिने आपल्या करिअरमध्ये प्रचंड संघर्ष केला.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर, करिअरच्या सुरुवातीच्या काळात, मुग्धा तिच्या गरजा भागवण्यासाठी आणि इतर खर्चासाठी पेट्रोल पंपावर काम करायची. या कामासाठी तिला दिवसाला 100 रुपये मिळायचे. यानंतर मुग्धाने जिममध्ये काम करायला सुरुवात केली. या दरम्यान तिने काही स्थानिक सौंदर्य स्पर्धांमध्येही भाग घेतला. 2002 हे वर्ष मुग्धाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि तिच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष ठरले.

एकामागोमाग एक जिंकल्या स्पर्धा!

याच वर्षी मुग्धाला ‘ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेल हंट’ ही स्पर्धा जिंकून पहिले यश मिळाले, जे तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरले. या विजयानंतर मुग्धा प्रसिद्धी झोतात आली. याशिवाय 2002मध्येच मुग्धाने ‘मिस इंडिया’मध्ये ‘बेस्ट मॉडेल’ आणि ‘बेस्ट नॅशनल कॉस्च्युम’चा किताब पटकावला होता. 2004 मध्ये, मुग्धा ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेतही ती सेमीफायनलमध्ये पोहोचली होती.

'फॅशन'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण

यानंतर मुग्धा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी स्वप्नांची नगरी मुंबईत आली. यानंतर तिने एअरटेल, क्लोजअप सारख्या अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केले आणि यासोबतच तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये सहभाग घेत रॅम्प वॉक केला. मुग्धाने 2008मध्ये मधुर भांडारकरच्या 'फॅशन'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील मुग्धाचा अभिनय चांगलाच पसंत केला गेला होता. या चित्रपटासाठी, तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण आणि स्टार स्क्रीन पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री श्रेणीसाठी नामांकन मिळाले होते.

या चित्रपटाच्या यशानंतर मुग्धाने 'ऑल द बेस्ट', 'जेल', 'हेल्प', 'हिरोईन', 'साहेब, बीवी और गँगस्टर रिटर्न्स' इत्यादी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. मुग्धा अजूनही चित्रपटसृष्टीत सक्रिय असून, लवकरच ती एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुग्धाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, ती गेल्या बऱ्याच वर्षांपासून अभिनेता राहुल देवसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 26 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Sonu Sood : कोरोनाकाळात केलेल्या विशेष कार्याबद्दल सोनू सूदचा 'आयएए विशेष पुरस्कारा'ने सन्मान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटकाDevendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget