![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Hanuman Review:उत्तम वीएफएक्स आणि कलाकारांचा अप्रतिम अभिनय; कसा आहे हनुमान चित्रपट? वाचा रिव्ह्यू
Hanuman Review: जगातील पहिले सुपरहिरो आणि सर्वात मोठे राम भक्त असणारे हनुमान यांच्याशी संबंधित असणारी कथा पडद्यावर आली आहे. ही कथा खूप जबरदस्त आहे. हा साऊथ चित्रपट खरोखरच अप्रतिम आहे.
![Hanuman Review:उत्तम वीएफएक्स आणि कलाकारांचा अप्रतिम अभिनय; कसा आहे हनुमान चित्रपट? वाचा रिव्ह्यू Hanuman Review prasanth verma directed teja sajja movie Review Hanuman Review:उत्तम वीएफएक्स आणि कलाकारांचा अप्रतिम अभिनय; कसा आहे हनुमान चित्रपट? वाचा रिव्ह्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/11/c184faeee211e87a1d6cab5a40f5d9ce1704976714305259_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hanuman Review: जय श्री राम, सध्या देशभरातील वातावरण हे भक्तीमय झालं आहे. 22 तारखेला रामलल्लाच्या मंदिराचं उद्धघाटन होणार आहे. अशा परिस्थितीत जगातील पहिले सुपरहिरो आणि सर्वात मोठे राम भक्त असणारे हनुमान यांच्याशी संबंधित असणारी कथा पडद्यावर आली आहे. ही कथा खूप जबरदस्त आहे. हा साऊथ चित्रपट खरोखरच अप्रतिम आहे.
चित्रपटाचं कथानक
एक गाव संकटात आहे. त्या गावातील गावकऱ्यांवर अत्याचार होत आहेत. त्यांच्यावर होण्याऱ्या दडपशाहीपासून वाचवण्यासाठी कोणीतरी पुढे येणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत गावातील हनुमान नावाच्या एका सामान्य मुलाला एक रत्न सापडते ज्यामध्ये हनुमानाची शक्ती आहे पण हे रत्न फक्त दिवसा आपली शक्ती दाखवू शकतो.तसेच चित्रपटात एक खलनायक आहे ज्याला जगातील सर्वात मोठा सुपरहिरो बनायचे आहे. या दोन कथा कुठे एकत्र येतात आणि हनुमानजी कसे जिंकतात? हे पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावे लागेल.
कसा आहे चित्रपट?
'हनुमान' हा चित्रपट उत्तम प्रकारे बनवला गेला आहे. हा चित्रपट एका सुपरहिरोच्या कथेपासून सुरू होतो आणि मग त्यात हनुमानाचा प्रवेश होतो. यानंतर अनेक ट्विस्ट येतात. चित्रपटा अनेक आश्चर्यकारक दृश्ये आहेत. तसेच चित्रपटात अप्रतिम अॅनिमेशन दिसते. चित्रपटात हनुमानजींचा असा अवतार पाहायला मिळतो जो हनुमानजींच्या भक्तांसाठी खूप खास आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स जबरदस्त आहे. लहान मुलांना हा चित्रपट खूप आवडेल आणि हनुमानजींच्या भक्तांना तर हा चित्रपट अप्रतिम वाटेल. चित्रपटाची कथा अतिशय मनोरंजक पद्धतीने उत्तम VFX सह सादर करण्यात आली आहे.
कलाकारांचा अभिनय
अभिनेता तेजा सज्जाने हनुमान नावाच्या मुलाच्या भूमिकेत अप्रतिम काम केले आहे. तो त्याच्या भूमिकेला न्याय देतो. तो गुंडांना मारतो आणि वाहनांऐवजी बुलडोझरही हवेत उडवतो आणि हे सर् सीन्स चांगले दिसतात कारण त्याच्याकडे हनुमानजींची शक्ती आहे. मीनाक्षीच्या भूमिकेत अमृता आयरने उत्तम काम केले आहे. वरलक्ष्मी सरथकुमारने हनुमानाच्या बहिणीची भूमिका चांगल्या पद्धतीनं साकारली आहे. ती आपल्या अभिनयानं छाप सोडते.
प्रशांत वर्माचे दिग्दर्शन अचूक आहे. त्यांने सर्व भावना, भक्ती आणि शक्ती यांचा समतोल साधला आहे. चित्रपटातील संगीत ते अधिक प्रभावी आहे. चित्रपटात हनुमान चालिसा आल्यावर वातावरण पूर्ण भक्तीमय होऊन जाते. चित्रपटातील Vfx खूप चांगले आहेत. चेबघायला मजा येते. तसेच चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी लाजवाब आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)