साबरमती एक्सप्रेसची खरी कहानी सांगतोय विक्रांत मेस्सी, ट्रेलर लॉन्चनंतर सुरू झालंय धमक्यांचं सत्र, म्हणाला...
The Sabarmati Report, Vikrant Messi: आगामी चित्रपट 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) चा ट्रेलर 6 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात विक्रांत मेस्सीला या चित्रपटात काम करत असल्यामुळे धमक्या मिळत आहेत का? असा प्रश्न विचारला.
Vikrant Massey Getting Threats: काही दिवसांपूर्वी विक्रांत मेस्सीच्या (Vikrant Messi) सेक्टर 36 (Sector 36) नं अख्खं ओटीटी हादरवलं. आता विक्रांत मेस्सी त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'द साबरमती एक्सप्रेस' (The Sabarmati Report) चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये विक्रांतनं सांगितलं की, या चित्रपटाच्या घोषणेपासूनच तिला धमक्या मिळत आहेत. दरम्यान, 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटात 27 फेब्रुवारी 2002 रोजी झालेल्या साबरमती एक्सप्रेस दुर्घटनेची खरी घटना दाखवली जाणार असल्याचं बोललं जात आहे. गुजरातमधील (Gujarat) गोध्राजवळ ही दुर्घटना घडली होती.
आगामी चित्रपट 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) चा ट्रेलर 6 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात विक्रांत मेस्सीला या चित्रपटात काम करत असल्यामुळे धमक्या मिळत आहेत का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्यानं हो मला धमक्या येत आहेत, असं उत्तर दिलं. विक्रांत मेस्सी म्हणाला की, "मला धमक्या येताहेत...? तुम्ही माझा फोन आणि इन्स्टाग्राम हॅक तर नाही केलं ना? खरंच, हे मला कुणीच विचारलं नाही. आणि मी अजून काही म्हटलं नाही, कारण मला कोणीच विचारलं नाही." पुढे बोलताना विक्रांत मेस्सी म्हणाला की, "हो.. मला धमक्या येताहेत... अजुनही येत आहेत. पण, जसं मी सांगितलं की, आम्ही कलाकार आहोत आणि आम्ही कथा सांगतो, लोक काय बोलत आहे, त्यांना काय वाटतंय...?"
दुर्दैवानं तुम्ही अजून हा चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे त्यापूर्वीच तुम्ही तुमचं मत बनवणं चुकीचं आहे. चित्रपट केवळ एकांकी विचार करतोय, असं मत व्यक्त करणंच चुकीचं आहे, असं वक्तव्य विक्रांत मेस्सी म्हणाला आहे. अशातच, ट्रेलर रिलीज झाला आहे. संपूर्ण तीन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये आपल्या लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे, तो मीडिया आहे, त्यांचं योगदान, त्यांची बाजू काय होती? यावर त्यांचं मत काय?.... 27 फेब्रुवारी 2002 रोजी जे झालं, त्यावर आधारित आहे, असं सांगितलं.
विक्रांत मेस्सी पुढे बोलताना म्हणाला की, "मी मला येणाऱ्या धमक्यांसोबत डील करतोय. आम्ही एक टीम म्हणून याचा सामना करत आहोत आणि असं वाटतंय की, येत्या काळातही करत राहू.."
दरम्यान, 'द साबरमती रिपोर्ट' 15 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज केली जाणार आहे. हा चित्रपट धीरज सरना यांनी दिग्दर्शित केला आहे. तर, एकता कपूर प्रोड्यूस करत आहे. विक्रांतसोबतच या चित्रपटात ऋद्धि डोगरा आणि राशी खन्ना दिसणार आहे.
पाहा ट्रेलर :
महत्त्वाच्या इतर बातम्या :