एक्स्प्लोर
सलमा आगा यांना ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया कार्ड मिळणार
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या बॉलिवूड गायिका आणि अभिनेत्री सलमा आगा यांना ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्ड मिळणार आहे. त्यामुळे सलमा यांना आजीवन भारतात येण्याची मुभा असेल. शिवाय, भारतात आल्यावर पोलिसांना रिपोर्ट करावंही लागणार नाही.
गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, “सलमा यांना ओसीआय कार्ड देण्याचा निर्णय नियमांनुसार घेतला आहे.”
गृहमंत्रालयाने सलमा यांना ओसीआय कार्ड देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन, त्यांचे आभार मानले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सलमा यांनी काही दिवसांपूर्वीच ओसीआय कार्डसाठी अर्ज केला होता आणि वेगवेगळ्या बाबी लक्षात घेऊन सलमा यांच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे.
59 वर्षीय सलमा आगा सध्या ब्रिटीश नागरिक आहेत. त्यांना बॉलिवूडमध्ये काही गाणीही गायली असून, ‘निकाह’सह काही सिनेमांमध्ये अभिनयही केला आहे.
सलमा यांना ‘निकाह’ सिनेमातील ‘दिल के अरमां आंसुओं में बह गए’ गाण्यासाठी 1982 साली सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
सलमाने ओसीआय कार्डसाठी अर्ज केला, कारण तिला अनेक कारणांसाठी भारतात यावं लागतं आणि इथे आल्यानंतर सारखं सारखं पोलिसांनी रिपोर्ट करावं लागू नये.
ओव्हरसीज सिटीझन नागरिकत्व कुणाला दिलं जातं?
ओव्हरसीज सिटीझन नागरिकत्व अशा परदेशी व्यक्तींनाच दिलं जातं, ज्यांचे पूर्वज 26 जानेवारी 1950 पर्यंत भारताचे नागरिक होते आणि फाळणीनंतर पाकिस्तानात निघून गेले. भारतात कोणत्याही प्रकारची जमीन खरेदीची परवानगी ओसीआय कार्डधारकांना नसते.
सलमा आगाचं भारताशी नातं
सलमा आगा ही अभिनेता जुगल किशोर मेहरा आणि अनवरी बेगम यांची नात आहे. सलमाची आई नसरीन आगा याही अभिनेत्री होत्या. नसरीन आगा यांनी ‘शाहजहाँ’मध्ये गायक-अभिनेता के. एल. सैगल यांच्या नायिकेची भूमिका केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement