एक्स्प्लोर
'संघर्षयात्रा'च्या रिलीजला अखेर मुहूर्त सापडला!
मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा बायोपिक 'संघर्षयात्रा' सिनेमाच्या रिलीजला अखेर मुहूर्त सापडला आहे. 14 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती सिनेमाचे दिग्दर्शक साकार राऊत यांनी दिली.
काही तांत्रिक बाबींमुळे सिनेमाची घोषणा झाल्यानंतरही सिनेमा रिलीज करण्यासाठी वेळ लागला, असं साकार राऊत यांनी सांगितलं. या सिनेमात सुचवलेले काही बदल करण्यात आले आहेत. सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला प्रमाणपत्र दिल्याने प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे, असंही साकार राऊत म्हणाले.
अभिनेता शरद केळकर गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर श्रुती मराठेने पंकजा मुंडे यांची भूमिका साकारली आहे. ओंकार कर्वे प्रमोद महाजन यांच्या तर, प्रवीण महाजन यांच्या भूमिकेत गिरीश परदेशी दिसणार आहे.
गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू, त्यापूर्वी त्यांचे नातेवाईक प्रमोद महाजन यांचा मृत्यू, मुंडे यांचं वादळी राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य, यामुळे या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
सिनेमाचा टीझर :
संबंधित बातमी : गोपीनाथ मुंडेंवरील 'संघर्षयात्रा' चित्रपटाला पंकजांचा विरोध
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement