एक्स्प्लोर

Good Newwz box office collection : अक्षय करीनासाठी 'गुड न्यूज', चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

अक्षय कुमारच्या 'गुड न्यूज' या चित्रपटाला प्रदर्शनाच्या दिवशी चांगली ओपनिंग मिळाली. त्यानंतर चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी मोठी मुसंडी मारली आहे.

मुंबई : खिलाडी अक्षय कुमार, करीना कपूर, पंजाबी अभिनेता दिलजित दोसांझ आणि रकुल प्रीत सिंह यांचा 'गुड न्यूज' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रदर्शनाच्या दिवशी चांगली ओपनिंग मिळाली. त्यानंतर चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई अक्षय कुमारसह इतर कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांसाठी गुड न्यूज ठरली आहे.

'गुड न्यूज'ने पहिल्या दिवशी (शुक्रवारी) 17.56 कोटी रुपयांची ओपनिंग मिळवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) 21.78 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईत पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी जवळ जवळ 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. दोन्ही दिवसात मिळून 'गुड न्यूज'ने 39.34 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते चित्रपट तिसऱ्या दिवशी अजून जास्त कमाई करेल. काही विश्लेषकांनी 'गुड न्यूज' रविवारी (आज) 25 कोटी रुपयांची कमाई करेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच 'गुड न्यूज'ला वर्षअखेर (31 डिसेंबर) आणि नव्या वर्षाचा पहिला दिवसाच्या (1 जानेवारी) सुट्ट्यांचा अधिक फायदा मिळेल. त्यामुळे 'गुड न्यूज' एका आठवड्यात शंभर कोटी क्लबमध्ये स्थान मिळवेल, असेही बोलले जात आहे.

चित्रपटाचा विषय काय? अलिकडे आपल्याकडे खूप फॅमिली प्लॅनिंग होतं. पाच-पाच सात-सात वर्ष थांबून मग गोड बातमी देण्याबद्दल विषय सुरू होतात. पण यात वय वाढतं. शरीरातही बदल होत असतात. मग अपत्य प्राप्तीची शक्यता धूसर होऊ लागते. अशावेळी सायन्स मदतीला येतं. आयव्हीएफ, टेस्ट ट्यूब बेबी यांसारखे पर्याय येतात. 'गुड न्यूज' या चित्रपटात आयव्हीएफ तंत्रज्ञानाची कास धरून गोष्ट मांडण्यात आली आहे. नामसाधर्म्यामुळे ही टेस्ट करताना एकमेकांचे (अक्षय कुमार - दिलजित दोसांझ) स्पर्म एकमेकांच्या बायकोच्या (करीना कपूर - रकुल प्रीत सिंह) शरीरात सोडले जातात असं याचं कथाबीज. पण याच्या अलिकडे आणि पलिकडे गोष्ट रचून दिग्दर्शकाने धमाल उडवून दिली आहे. लग्नानंतर काळ उलटतो तसे नातेवाईकांकडून मारले जाणारे टोमणे.. अपत्य प्राप्तीसाठी उत्सुक असल्यानंतर विशिष्टवेळी जवळ येण्याचा पत्नीचा ह्ट्ट, यातून यंत्रवत होत जाणारं नातं असे पदर यात मांडले आहेत.

Good News Movie Review : खरंच गुड न्यूज!

महत्त्वाच्या बातम्या

Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget