एक्स्प्लोर
पहिल्या दिवसाच्या कमाईत 'गोल्ड' अव्वल की 'सत्यमेव जयते'?
गोल्डने पहिल्या दिवशी 25.25 कोटी, तर 'सत्यमेव जयते'ने 20.52 कोटी रुपयांचा गल्ला कमवला.
मुंबई : स्वातंत्र्यदिनी बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांची रस्सीखेच पाहायला मिळाली. मात्र या लढतीत अक्षयच्या 'गोल्ड'ने जॉनच्या 'सत्यमेव जयते'ला धोबीपछाड केलं. गोल्डने पहिल्या दिवशी 25.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
भारताने मिळवलेल्या पहिल्या सांघिक सुवर्णपदकाची कथा सांगणाऱ्या 'गोल्ड' चित्रपटाला पहिल्याच दिवशी म्हणजे स्वातंत्र्यदिनी तूफान प्रतिसाद मिळाला. गोल्डने पहिल्या दिवशी तब्बल 25 कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली. जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते'ने पहिल्या दिवशी 20 कोटी 52 लाख रुपयांचा गल्ला कमवला.
#Gold has an EXTRAORDINARY Day 1... Takes a FAB START at plexes across major centres... Wed ₹ 25.25 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) August 16, 2018
'गोल्ड' हा वर्षभरातला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा तिसरा सिनेमा ठरला आहे. अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला संजय दत्तचा बायोपिक 'संजू' (34.75 कोटी) हा पहिल्या क्रमांकावर आहे. तर सलमान खानचा 'रेस 3' (29.17 कोटी) हा चित्रपट सर्वाधिक ओपनिंगच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे 'सत्यमेव जयते' या यादीत फार मागे नाही. 2018 मध्ये सर्वाधिक ओपनिंग मिळवणाऱ्या सिनेमांमध्ये टायगर श्रॉफचा 'बागी 2' (25.10 कोटी) चौथ्या, तर 'सत्यमेव जयते' (20.52 कोटी) पाचव्या क्रमांकावर आहे.#SatyamevaJayate springs a BIG SURPRISE... Plexes are good, but single screens are ROCKING... Wed ₹ 20.52 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) August 16, 2018
सत्यमेव जयते हा सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र मिळवूनही सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. हा जॉन अब्राहमचा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.TOP 5 - 2018 Opening Day biz... 1. #Sanju ₹ 34.75 cr 2. #Race3 ₹ 29.17 cr 3. #Gold ₹ 25.25 cr 4. #Baaghi2 ₹ 25.10 cr 5. #SatyamevaJayate ₹ 20.52 cr India biz. Hindi films... Hollywood films not included.
— taran adarsh (@taran_adarsh) August 16, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement