Gigi Hadid Arrested : लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल जिजी हदीदला अटक; नेमकं प्रकरण काय?
Gigi Hadid : अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल गिगी हदीदला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून नंतर जामिनावर सुटकाही झाली.
Gigi Hadid Arrested : अभिनेत्री आणि मॉडेल जिजी हदीद (Gigi Hadid) नेहमीच तिच्या फॅशनमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. पण आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. जिजीच्या बॅगमधला गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून अटकही करण्यात आली. पण नंतर जामिनावर सुटकाही झाली.
नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री जिजी हदीदकडून प्रवासादरम्यान गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी अटकही करण्यात आली आहे. त्यासोबत तिला दंडही ठोठावण्यात आला आहे. जिजी आणि तिची मैत्रिण लिआह निकोल मॅककार्थी एका खासगी विमानाने प्रवास करत होते. दरम्यान जिजी आणि लिआहच्या बॅगची झडती घेण्यात आली. दरम्यान या दोघींच्या बॅगमध्ये गांजा सापडला. जिजी आणि लिआह गांजा कॅमेन आयलँडमध्ये घेऊन जात असल्याची शंका पोलिसांना आली आणि त्यामुळेच त्यांनी अटक केली.
जिजी आणि लिआहच्या बॅगेत गांजा आढळल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. त्यानंतर 12 जुलै 2023 रोजी जिजी आणि लिआर या दोघांनी समरी कोर्टात हजर करण्यात आले. तसेच त्यांनी दोषी ठरवण्यात आले. दरम्यान त्यांना 1000 डॉलर दंड ठोठावण्यात आला आणि त्यांना जामीन मिळाला.
View this post on Instagram
जिजी सध्या हॉलिवूड अभिनेता लिओनार्डा डी कॅप्रियोला डेट करत असल्याची चर्चा आहे. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण अद्याप दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतरित्या भाष्य केलेलं नाही. लिओनार्डो आधी जिजी गायक झेन मलिकला डेट करत होती.
'या' कारणाने जिजी चर्चेत!
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्धाटनादरम्यान वरुण धवनने हॉलिवूड अभिनेत्री जिजी हदीदला उचलून घेत आणि तिच्या गालावर किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वरुन धवनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्याला चांगलच ट्रोल केलं होतं. वरुण धवनमुळे जिजी चर्चेत आली होती. गिगिला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरुन धवनने ट्वीट करत त्याची बाजू मांडली आहे. त्याने ट्वीट केलं आहे,"गिगिला मी मंचावर घेऊन येणार आणि किस करणार हे आधीच ठरलं होतं. त्यामुळे कारण माहिती नसताना त्यावर भाष्य करू नका".
संबंधित बातम्या