(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gehraiyaan Teaser : Deepika Padukone आणि Siddhant Chaturvediचा किसिंग सीन व्हायरल, पाहा टीजर
Gehraiyaan Teaser out : दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि सिद्धार्थ चर्तुवेदी (Siddhant Chaturvedi) यांच्या आगामी 'गेहराईया' (Gehraiyaan) चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे.
Gehraiyaan Teaser out : अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि सिद्धांत चर्तुवेदी (Siddhant Chaturvedi) यांच्या आगामी 'गहराईयां' (Gehraiyaan) चित्रपटाचा टीजर (Teaser) नुकताच प्रदर्शित करण्यात आहे. दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चर्तवेदी दिग्दर्शक शकुन बत्राच्या (Shakun Batra) यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री अनन्या पांडेही महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 'गहराईयां' चित्रपटाच्या टीजरमध्ये दीपिका आणि सिद्धांतची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळतेय.
अवघ्या काही तासांतच हा टीजर चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. यामध्ये सुरुवातीला सिद्धांत दीपिकाच्या घराचा दरवाजा ठोकवतो. त्यानंतर दीपिका दरवाजा उघडते. यानंतर दोघांचा सावलीमधील किसिंग सीन दाखवण्यात आलाय. टीजरच्या शेवटी दीपिका आणि सिद्धांतचा बोल्ड किसिंग सीन आहे. यामध्ये दीपिकाही हॉट बिकनी लूकमध्ये पाहायला मिळतेय.
चित्रपटाची पहिली झलक शेअर करताना दीपिकाने इंस्टाग्रामवर लिहिले, ''माझ्या हृदयाचा तुकडा''. अनन्या पांडेने लिहिले, ''आता आणखी खोल जाण्याची वेळ आली आहे''. सिद्धांतने लिहिले, असे म्हणतात की, ''तुम्हांला जे हवे आहे, त्यात तुम्ही काहीतरी दुसरे सोडून द्या, येथे तुम्हांला माझे हृदय सापडेल.''
टीजरच्या पहिला झलकवरून चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज लावणे कठीण आहे पण नात्यातील गुंतागुंतीवर चित्रपटात लक्ष केंद्रित केले जाईल असे दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शकुन बत्रा आहेत. हा चित्रपट 25 फेब्रुवारीला ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबई, गोवा आणि अलिबागमध्ये झालं आहे. लॉकडाऊनमुळे हे चित्रीकरण थांबलं होतं. मात्र त्यानंतर या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- The Kashmir Files : 'द काश्मीर फाईल्स'चे पोस्टर प्रदर्शित, काश्मिरी पंडितांच्या संघर्षाची कहाणी
- Omicron : धोक्याची घंटा! संकटाचा सामना करण्यास तयार राहा - AIIMS संचालक रणदीप गुलेरिया
- खड्ड्यांची माहिती देणारं सरकारी अॅप; रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून नेव्हिगेशन अॅप लाँच
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha