Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटीलचं खरं नाव माहितेय का? स्वत:च केला खुलासा
Gautami Patil : आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमीचं खरं नाव वेगळचं आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात तिने यासंदर्भात खुलासा केला आहे.
Gautami Patil : नृत्यांगना सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असले. आपल्या नृत्याने तिने सर्वांनाच घायाळ केलं आहे. अभिनेत्रीचा सोशल मीडियावरदेखील मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमीचं खरं नाव मात्र वेगळचं आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात तिने यासंदर्भात खुलासा केला आहे.
गौतमी पाटीलचं खरं नाव काय? (Gautami Patil Real Name)
गौतमी पाटील वेगवेगळ्या कार्यक्रमात हजेरी लावत असते. नृत्यांगनेच्या अदा पाहण्यासाठी चाहते घायाळ होतात. गौतमीचा मोठा चाहतावर्ग असून नुकत्याच एका कार्यक्रमात चाहत्यांसोबत संवाद साधताना तिने तिचं खरं नाव सांगितलं आहे.
पुण्यातील जुन्नर येथील केवाडी भागात आदिवासी नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गौतमी पाटीलदेखील उपस्थित होती. त्यावेळी गौतमीला भेटण्यासाठी तिची एक चिमुकली चाहतीदेखील उपस्थित होती. दरम्यान आपल्या चाहतीला गौतमीने तिचं नाव विचारलं. चाहतीने आपलं नाव 'वैष्णवी' असल्याचं सांगितलं. त्यावर नृत्यांगना म्हणाली,"माझंदेखील जन्मनाव वैष्णवी आहे". चाहतीसोबत गप्पा मारताना गौतमीने आपलं खरं नाव जगजाहीर केलं आहे. आता वैष्णवी या नावामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
'पाटील' आडनावामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली गौतमी पाटील!
गौतमी पाटील आणि वाद हे समीकरण झालं आहे. नृत्यांगनेच्या नावावरुन याआधीदेखील वाद झाला होता. गौतमीने पाटील आडनाव लावू नये असा इशारा तिला देण्यात आला होता. गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. तिने पाटील आडनाव लावलं तर महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा मराठा समन्वयकडे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला होता. त्यानंतर गौतमीच्या वडिलांनी गौतमी पाटील आहे आणि ती तेच नाव लावणार असं म्हटलं होतं.
गौतमी पाटील कायमच चर्चेत!
गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. एकीकडे तिच्यावर जोरदार टीका होत असली तरी तिला पाठिंबा देणारी मंडळी कमी नाहीत. आपल्या नृत्य सादरीकरणात अश्लील इशारा करत असल्याने तिच्यावर प्रचंड टीका झाली. त्यानंतर गौतमीनेदेखील सर्वांची माफी मागत चूक सुधारणार असल्याचं सांगितलं. गौतमीच्या कार्यक्रमांना पुरुष चाहत्यांप्रमाणे महिलावर्गदेखील मोठ्या संख्येने उपस्थित असतो. गौतमीचा 'घुंगरू' हा मराठी सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. पण या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.
संबंधित बातम्या