Gauri Sawant ON Taali : "आपलीच 'टाळी' जेव्हा जोरात वाजते.."; 'ताली' पाहिल्यानंतर गौरी सावंतची पहिली प्रतिक्रिया
Taali Webseries : गौरी सावंतच्या (Gauri Sawant) आयुष्यावर आधारित 'ताली' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून आता यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Gauri Sawant On Sushmita Sen Taali Web Series : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) अभिनित 'ताली' (Taali) ही बहुचर्चित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. क्षितिज पटवर्धन (Kshitij Patwardhan) यांनी लिहिलेल्या या सीरिजचं दिग्दर्शन रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी केलं आहे. गौरी सावंत (Gauri Sawant) यांच्या आयुष्यावर आधारित ही सीरिज आहे. आता ही सीरिज पाहिल्यानंतर गौरी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'ताली' पाहिल्यानंतर गौरी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया (Gauri Sawant First Reaction On Taali Web series)
'ताली' ही सीरिज पाहिल्यानंतर गौरी सावंत यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"आपलीच 'टाळी' जेव्हा जोरात वाजते, तेव्हा कधी कधी आपणच दचकतो, जसं आपली जीभ आपल्या दाताखाली येते तेव्हा. आज बायोपिक बघताना हेच होतं माझ्या मनात, ठिबक सिंचन डोळ्यातून चालूच होते".
गौरी सावंत यांनी पुढे लिहिलं आहे,"तृतीयपंथीयांच्या पालकांना काय वाटत असेल... होणारी घुसमट, त्रास याला न्याय दिला आहे सुष्मिताने.. क्षितिद काय लिहिलंय रे बाबा... रवी दाधव यांनी खूप छान दिग्दर्शन केले आहे. माझ्या काय लिहिलंय रे बाबा... रवी जाधव यांनी खूप छान दिग्दर्शन केले आहे. माझ्या संपूर्ण समाजाकडून मी तुमचे आभार मानते... सरळ सोप्या पद्धतीने माझे आयुष्य दाखवल्याबद्दल..अफिफा नडीयादवाला हिने मला नव्याने जगासमोर आणलं... कार्तिक आणि अर्जुन यांचेही आभार".
View this post on Instagram
गौरी सावंत यांच्या या पोस्टवर "आमच्यासाठी सगळ्यात मोठी पावती आहे ही गौरी", अशी कमेंट लेखक क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली आहे. तर दिग्दर्शक रवी जाधव यांनी "ज्यांच्या आयुष्यावर आपण चित्रपट तयार करतो त्यांच्याकडून कौतुक करण्यासारखा दुसरा आनंद नाही... धन्यवाद गौरी सावंत... आमच्यासाठी हे सर्वात मोठे कौतुक आहे". तर चाहत्यांनीही गौरी सावंत तुमचा संघर्ष प्रेरणादायी आहे.. अप्रतिम सीरिज अशा कमेंट्स केल्या आहेत.
'ताली' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून सुष्मिता सेनच्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर गौरी सावंत यांच्याबद्दलचा आदर वाढला आहे. गौरी सावंतचा संघर्ष या सीरिजमध्ये मांडण्यात आला आहे. आयुष्यात आलेल्या अडचणींचा सामना तिने कशाप्रकारे केला हे पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतात. सुष्मिता सेनसह नितेश राठोड, अंकुर भाटिया, कृतिका देव, ऐश्वर्या नारकर, विक्रम भाम आणि अनंत महादेवन या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. प्रेक्षकांना जिओ सिनेमावर ही सीरिज पाहता येईल.
संबंधित बातम्या