एक्स्प्लोर
तीन पुरुष रिक्षात असताना गँगरेप पीडितेने बसायचंच का?: किरण खेर
विरोधकांनी या वक्तव्याचा समाचार घेतल्यानंतर किरण खेर यांनीच टीकाकारांना झापलं आहे. प्रत्येक वक्तव्याला राजकीय रंग देण्याची आवश्यकता नाही, असं त्या म्हणाल्या.
![तीन पुरुष रिक्षात असताना गँगरेप पीडितेने बसायचंच का?: किरण खेर Gangrape victim should have avoided boarding auto with 3 men : BJP MP Kirron Kher latest update तीन पुरुष रिक्षात असताना गँगरेप पीडितेने बसायचंच का?: किरण खेर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/30164604/Kirron-Kher.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चंदिगढ : रिक्षामध्ये आधीच तीन पुरुष बसले होते, तर 'गँगरेप पीडित' तरुणीने थोडा कॉमन्स सेन्स लावायला हवा होता, रिक्षात बसायला नको होतं, असं वक्तव्य भाजप खासदार आणि अभिनेत्री किरण खेर यांनी केलं आहे. किरण खेर यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियासह सर्व स्तरातून टीकेची झोड उठवली जात आहे.
चंदिगढमध्ये 17 नोव्हेंबर रोजी 21 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. रिक्षाने घरी परतताना हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे.
या घटनेचा उल्लेख करत किरण खेर म्हणाल्या, 'तरुणीने थोडीशी बुद्धी लावायला हवी होती. सगळ्याच मुलींना मला सांगायचं आहे. जर आधीच रिक्षात तीन पुरुष होते, तर त्यात बसायला नको होतं. मी मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेच बोलत आहे' असं बुधवारी किरण खेर म्हणाल्या.
विरोधकांनी या वक्तव्याचा समाचार घेतल्यानंतर किरण खेर यांनीच टीकाकारांना झापलं आहे. प्रत्येक वक्तव्याला राजकीय रंग देण्याची आवश्यकता नाही, असं त्या म्हणाल्या.
मी एक स्त्री आहे आणि एक आईसुद्धा. महिलांच्या हक्कासाठी मी कायम संसदेत आणि बाहेरही आवाज उठवला आहे. या प्रकाराला राजकीय रंग देणं दुर्दैवी आहे. मी फक्त शहरातील मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी व्यक्त केली, असंही किरण खेर म्हणाल्या.
किरण खेर यांनी सर्व महिलांना स्वतःची काळजी घेण्याचंही आवाहन केलं. मी एक राजकीय नेता म्हणून नाही, तर आई म्हणून काळजी व्यक्त करत आहे, असं किरण खेर यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)