एक्स्प्लोर

GADAR 2 : तारासिंग पुन्हा जाणार पाकिस्तानात! गदर 2 ची गोष्ट ठरली

2001 मध्ये गदर सिनेमा आला खरा. पण त्याच वेळी आलेल्या लगानमुळे सनी देओल विरुद्ध आमीर खान असा सामना रंगला होता. दोन्हीं पैकी कोणता सिनेमा हिट ठरेल याचे कयास बांधले गेले. पण लोकांना दोन्ही सिनेमे आवडले.

मुंबई : सनी देओलने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. घायल, घातक, दामिनी, जिद्दी असे अनेक. या सगळ्यात कडी केली होती ती गदर सिनेमाने. 2001 मध्ये आलेल्या गदरने धमाका केला. आमिषा पटेल आणि सनी देओल यांच्या गदर सिनेमातली गाणी तर गाजलीच शिवाय, सनीने रंगवलेला तारासिंग लोकांना आवडला. आता तब्बल 20 वर्षांनी गदरमधला हा तारासिंग पुन्हा एकदा पाकिस्तानात जाणार आहे. आणि तीच असणार आहे गदर 2 ची गोष्ट. 

2001 मध्ये गदर सिनेमा आला खरा. पण त्याच वेळी आलेल्या लगानमुळे सनी देओल विरुद्ध आमीर खान असा सामना रंगला होता. लगान आणि गदर यापैकी कोणता सिनेमा हिट ठरेल याचे कयास बांधले गेले. पण लोकांना दोन्ही सिनेमे आवडले. प्रत्येक सिनेमाचा क्राऊड वेगळा असतो, त्या सिनेमांना प्रेक्षकांनी जिंकवलं. सकिनाला शोधायला गेलेल्या तारासिंगचाा अवतार लोकांना आवडला. त्यानंतर अनिल शर्मा यांंनी देओल कुटुंबियांना घेऊन अपने बनवला होता. आता शर्मा यांना गदर 2 ची गोष्ट सुचली आहे. त्यातलं नेमकं कथानक काय असेल ते नीट कळलं नसल तरी वन लाईन बाहेर आली आहे. आता तारासिंग पुन्हा एकदा पाकिस्तान गाठणार आहे, पण यावेळी तारासिंग आपल्या मुलासाठी, चरणसिंगसाठी पाकिस्तानला जाणार आहे. 

याबद्दल अधिकृत महीती कुणीच देताना दिसत नाही, पण मिळालेल्या माहितीनुसाार या सिनेमाची गोष्ट तयार होते आहे. आणि विशेष बाब अशी की या सिनेमात अनिल शर्मा यांना आपल्या मुलाला उत्कर्ष शर्मा याला सिनेमात घ्यायचं आहे. त्यामुळे गदर 2 बनला तर या सिनेमात सनी देओल आणि उत्कर्ष असे दोन चेहरे बघायला मिळणार असल्याची शक्यता आहे. सिनेमाच्या गोष्टीवर अद्याप काम चालू आहे. अजून पटकथा, संवाद तयार व्हायला वेळ आहे. अनिल शर्माही सध्या अपनेच्या सिक्वेलमध्ये व्यग्र आहेत. त्यामुळे अपनेचा पुढचा भाग तयार झाल्यानंतर गदर 2 च्या चित्रिकरणाकडे देओल आणि शर्मा वळतील. 2022 मध्ये या सिनेमाचं चित्रिकरण पूर्ण होईल असं सध्या भाकित वर्तवलं जातंय. 

अलिकडच्या काळात अनेक सिनेमांच्या सिक्वेललाा सुरूवात झाली आहे. अपने 2 हा तर बनतो आहे. गदर 2 चीही तयारी चालू आहे. शिवाय, टायगर 3 चं चित्रिकरणही सुरू झालं आहे. अक्षयकुमार आणि परेश रावल यांची मुख्य भूमिका असलेल्या ओह माय गॉड 2 या सिनेमाचं चित्रिकरणही नुकतंच सुरू झालं. दिग्दर्शक प्रियदर्शन हेराफेरी 3 ची तयारी करू लागलेत. हंगामा 2 या सिनेमाच्या चित्रिकरणालाही सुरूवात झाली आहे. मर्दानी 3 चीही तयारी मधल्या काळात सुरू होती. त्यामुळे पुढच्या दोन वर्षात अनेक सिनेमांचे सिक्वेल्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Sameer Khandekar on Daughter School:'लेकीसाठी मराठीच शाळा हवी...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, दादरमध्ये मराठमोळं रेस्टॉरंटही सुरू केलं, सांगितला किस्सा
'लेकीसाठी मराठीच शाळा हवी...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, दादरमध्ये मराठमोळं रेस्टॉरंटही सुरू केलं, सांगितला किस्सा
Amitabh Bachchan On French Football Team: 'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले
'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले
Zubair khan on Bigg boss 11: 'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
Alpha Review: स्पाय युनिव्हर्सचा अपमान करणारा आलिया भटचा 'अल्फा'; ना दमदार कथा, ना अॅक्शन अन् ना अभिनय
स्पाय युनिव्हर्सचा अपमान करणारा आलिया भटचा 'अल्फा'; ना दमदार कथा, ना अॅक्शन अन् ना अभिनय

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली DCC बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश
हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली DCC बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश
Sharad Pawar NCP and BJP Talks: शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत एनडीएत जाण्याची चर्चा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शरद पवारांनी विचारधारा...'
शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत एनडीएत जाण्याची चर्चा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शरद पवारांनी विचारधारा...'
Nagpur Railway Crime News: रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
Zubair khan on Bigg boss 11: 'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
Sharad Pawar and Sunetra Pawar: बारामतीमधील महत्त्वाच्या संस्थेवर युगेंद्र पवारांची वर्णी, शरद पवार-सुनेत्रा पवार एकत्र
बारामतीमधील महत्त्वाच्या संस्थेवर युगेंद्र पवारांची वर्णी, शरद पवार-सुनेत्रा पवार एकत्र
Embed widget