June OTT Release : 'आश्रम'पासून 'रनवे 34'पर्यंत, चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी
June OTT Release : जून महिन्यात ओटीटीवर अनेक वेबसीरिज आणि सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

June OTT Release : मे महिन्यात अनेक वेब सीरिज आणि सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित झाले असून हे वेब सीरिज आणि सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आता जून महिन्यातदेखील अनेक सिनेमे आणि वेबसीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. जाणून घ्या जून महिन्यात ओटीटीवर कोणते सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार...
आश्रम सीझन 3
कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज? एमएक्स प्लेअर
कधी होणार रिलीज? 3 जून
प्रकाश झा दिग्दर्शित आश्रमच्या तिसऱ्या सीझनमध्ये बॉबी देओलने बाबा निरालाची भूमिका साकारली होती. या सीरिजमध्ये चंदन रॉय, सान्याल, आदिती पोहनकर, त्रिधा चौधरी आणि ईशा गुप्ता मुख्य भूमिकेत आहेत. या सीरिजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता.
आशिकाना
कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज? डिज्नी प्लस हॉटस्टार
कधी होणार रिलीज? 6 जून
'आशिकाना'मध्ये पोलीस इन्स्पेक्टरची कथा दाखवण्यात आली आहे. या वेबसीरिजमध्ये झैन आबाद खान आणि खुशी दुबे मुख्य भूमिकेत आहे. ही वेबसीरिज 6 जूनपासून प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.
मिस मार्वल
कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज? डिज्नी प्लस हॉटस्टार
कधी होणार रिलीज? 8 जून
मिस मार्वल या सिनेमात इमान वेल्लानी मिस मार्वलची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात फरहान अख्तरदेखील दिसणार आहे. हा सिनेमा इंग्रजी, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. 8 जून पासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहायला मिळेल.
अर्ध
कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज? झी 5
कधी होणार रिलीज? 10 जून
'अर्ध' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा पलाश मुच्छान यांनी सांभाळली आहे. तर या सिनेमात राजपाल यादव आणि रुबिना दिलैक, हितेन तेजवानी आणि कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही वेबसीरिज झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 10 जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
द ब्रोकन न्यूज
कोणत्या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित? झी 5
कधी होणार सिनेमा रिलीज? 10 जून
'द ब्रोकन न्यूज' या सीरिजच्या माध्यमातून सोनाली बेंद्रे ओटीटीवर पदार्पण करणार आहे. सोनालीसोबत या वेब सीरिजमध्ये जयदीप अहलावत आणि श्रिया पिळगावकरदेखील दिसून येणार आहे. ही वेबसीरिज झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 10 जूनपासून प्रेक्षक ही वेबसीरिज पाहू शकतात.
रनवे 34
कोणत्या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित? अॅमेझॉन प्राइम
कधी होणार रिलीज? 24 जून
'रनवे 34' हा सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे. अजय देवगनने विक्रांत खन्नाचे पात्र साकारले होते. या सिनेमात अमिताभ बच्चन, रकुल प्रीत सिंह आणि बोमन ईरानी मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 24 जूनला अॅमेझॉन प्राइम या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
Singer KK Net Worth : लक्झरी लाईफ जगत होता केके, सोबत होता अलिशान गाड्यांचा ताफा
IIFA Awards 2022 : 'IIFA' पुरस्कार सोहळा अबुधाबीत पार पडणार; सलमान खान करणार होस्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
